शास्त्रीनगर, आंबेडकर नगर व शिवनगर येथील नागरिकांचा जीव धोक्यात… प्रशासनाने पूर्व तयारी करावी

30

🔹आम आदमी पार्टी घुग्घुस…

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.20जुलै):- गावाला लागूनच वाहत असलेल्या वर्धा नदीच्या काठावर असलेले शिवनगर व शास्त्रीनगर हे दोन वार्ड घुग्घुस नगर परिषदेच्या हद्दीतील आहे. वर्धा नदीला दी.१८/०७/२०२२ रोजी पाणी सोडल्यामुळे येथील शिवनगर व शास्त्रीनगर मधील काही घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे तिथे पूर येण्याचे प्रमाण वाढलेले आहे. परत तीन दरवाजे उघडण्यात येणार असल्यामुळे तिथे पूरस्थिती निर्माण झालेली असताना दिसून येते. या सर्व बाबी लक्षात घेता आम आदमी पार्टी घुग्घुस द्वारा नगरपरिषद कार्यालय घुग्घुस व तलाठी कार्यालय घुग्घुस इथे १९/०७/२०२२ रोजी निवेदन देण्यात आले व तिथे पूर येण्याच्या आधी सावधगिरी बाळगावी अशी मागणी करण्यात आली इथे कुठलेही नुकसान किंवा जीवितहानी झाल्यास याचे पूर्ण जबाबदार प्रशासन राहील असा इशारा देण्यात आला.

यावेळी शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, सहसचिव विकास खाडे, सह संघटनमंत्री आशिष पाझारे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप धणविजय, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.