डॉक्टर शरद गायकवाड यांचे मलेशिया विद्यापीठात व्याख्यान

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

कोल्हापूर(दि.20जुलै):- येथील महावीर महाविद्यालयाच्या वरिष्ठ शाखेकडील मराठी विभागात कार्यरत असणारे डॉ शरद गायकवाड हे मलेशिया येथे शुक्रवार दिनांक 22 जुलै 2022 रोजी संपन्न होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे या चर्चासत्रामध्ये व्याख्यान देण्यासाठी जात आहेत .यापूर्वी 2019 मध्ये रशिया देशातील मास्को शहरातील अलेक्झांडर पुष्किन विद्यापीठांमध्ये संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय अण्णाभाऊ साठे चर्चासत्रामध्ये त्यांनी मानवतावादी जागतिक लेखक अण्णाभाऊ साठे या विषयावर जगभरातील संशोधकांसमोर व्याख्यान दिले होते ऑक्टोबर 2019 मध्ये थायलंड देशातील बँकॉक शहरातील फोन बुरी विद्यापीठामध्ये फुल संपन्न झालेल्या फुले शाहू आंबेडकर साहित्य संमेलनाचे ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मे 2022 मध्ये हिमाचल प्रदेश मध्ये संपन्न झालेल्या हिमाचल विद्यापीठामध्ये त्यांनी महापुरुष आणि भारतीय लोकशाही या विषयावर व्याख्यान दिलेले आहे.

नाशिक आणि कोल्हापूर येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी नेत्यांनी भूषवलेले आहे समाज प्रबोधनात्मक त्यांनी आजवर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि अण्णाभाऊ साठे बहुजनवादी साहित्य क्रांतीच कुळ आणि बंडाचे मूळ मातंग समाजावर शिवाजी विद्यापीठात पीएचडी केलेला प्रबंध ग्रंथरूपाने प्रकाशित करून मातंग समाज साहित्य आणि संस्कृती हा ग्रंथ तसेच सध्या परिवर्तनवादी चळवळीत बहुचर्चिला जात असलेला प्रबोधन चळवळीतील मातंगाची शौर्यगाथा अशा एकूण 13 ग्रंथांची निर्मिती डॉक्टर शरद गायकवाड यांनी केलेली आहे गेल्या वर्षी अमेरिका रशिया थायलंड पोलंड जर्मनी आणि पाकिस्तान अशा अकरा देशातल्या मान्यवरांची ऑनलाइन अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय व्याख्यानमाला त्यांनी संपन्न केलेली आहे सर सध्या सत्यशोधक चळवळ स्वातंत्र्य चळवळ आणि आंबेडकरी चळवळीतील महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या कर्तुत्वान स्त्रियांच्यावर मातंग महानायिका हा ग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहे डॉ शरद गायकवाड हे मलेशिया देशातील मला या विद्यापीठात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आंबेडकर चर्चासत्रामध्ये मार्गदर्शन करणार आहेत नुकतेच त्यांना मलेशिया देशातील कुलगुरूंचे निमंत्रण पत्र प्राप्त झालेले आहे सरांच्या या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे

कोल्हापूर, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED