कृषिकन्यांची उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती, मध्यवर्ती बँक आणि कृषी केंद्राला भेट…!

🔹ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत उपक्रम

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.21जुलै):-ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम 2022 अंतर्गत कृषी महाविद्यालय उमरखेड येथील सातव्या सत्रात शिकत असलेल्या विद्यार्थिनी कु. वैष्णवी शिंदे, कु. प्रियंका मुंगे, कु. शिवानी राठोड, कु. अवंती लोकरे व कु.आरती शिंदे या कृषीकन्यांनी उमरखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली.

भेटीदरम्यान कापूस, तूर, दाळ, सोयाबीन, चना अशा अनेक शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्याबाबत लिलाव कसा केला जातो व धान्य कोठार संबंधित उत्पादीत शेतमालास योग्य भाव मिळेपर्यंत कृषी समितीच्या कोठारात माल कश्या प्रकारे साठवून ठेवला जातो.

याची माहिती बाजार समितीचे सचिव श्री. संदीप जाधव आणि इतर कार्यालयीन कर्मचारी यांच्या कडून घेतली.तसेच कृषी कन्यांनी मध्यवर्ती बँकेला भेट देऊन शेती विषयक कामासाठी लोन घेण्याची प्रक्रिया कशी आहे याबद्दल माहिती मिळवली.

त्याचबरोबर कृषीकन्यांनी कृषी केंद्राला भेट देऊन कोणती खते कोणत्या पिकांसाठी वापरली जातात व शेतकऱ्यांना कोणत्या भावात विकली जातात इत्यादी बद्दल माहिती घेतली.

सदर उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य एस .के.चिंतले सर, विषय तज्ञ प्रा.अनिल इंगळे सर व ग्रामीण जागृतता कार्यक्रमाचे अधिकारी प्रा.अक्षय तामसेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED