


✒️फलटण(पुरोगामी न्युज नेटवर्क)
फलटण(दि.22जुलै):-श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय फलटण येथे इ. १२ वी सायन्स नंतर वेगवेगळ्या प्रवेश परीक्षेसाठी मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले.या मार्गदर्शन वर्गाचे उदघाटन संस्थेचे मानद सचिव मा.श्री डॉ.सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी केले.याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अमीर भाई शेख व पत्रकार नसीर भाई शीकलगार उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या ऑनलाइन सॉफ्टवेअरचे प्रमुख सय्यद सर् व बागवान सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, श्री थोरात एस. बी. सर यांनी केले व या मार्गदर्शन वर्गाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. प्रा. श्री वाघ जी. बी. सर यांनी सर्वांचे स्वागत केले. याप्रसंगी आदरणीय सचिनभैय्यासाहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहण्यासाठी अभ्यास व विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन आवश्यक आहे. आपल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये हे सर्व मार्गदर्शन वर्ग सुरू करीत आहोत त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी करून घ्यावा असे आवाहन केले.या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री नलवडे एल. के. तसेच सर्व प्राध्यापक वर्ग त्याचबरोबर सर्व प्रवेशार्थी विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार सायन्स विभाग प्रमुख प्रा. साळुंखे पी. व्ही. सर यांनी मानले.




