स्टुडंन्ट्स वेलफेअर इंग्लिश मेडीयम स्कुल तथा टि.आर.अग्रवाल सि.बि.एस.ई.स्कुल येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

50

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.22 जुलै):-स्टुडंन्ट्स वेलफेअर इंग्लिश मेडीयम स्कुल तथा टि.आर.अग्रवाल सि.बि.एस.ई.स्कुल येथे तालुका विधी सेवा समिती उमरखेड यांच्या माध्यमातून कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.विद्यार्थ्यांना बालकांच्या विविध कायद्यासंदर्भात परिचय व्हावा यासाठी या कार्यक्रमाचा उद्देशाने ही शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमासाठी मुख्य दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर उमरखेड तथा अध्यक्षा तालुका विधी समिती उमरखेड पी एस पाटील मॅडम तथा सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर उमरखेड ए.एस.शेख यांची विशेष उपस्थिती लाभली.

सन्माननीय न्यायाधीश पी.एस.पाटील मॅडम यांनी प्रास्ताविकेतून “Today’s Sutdents are tomorrow’s citizens of our Nation and also the India’s bright future ” असे मत प्रतिपादन केले.विद्यार्थीदशेत कायदेविषयक जाणिवेचे किती महत्त्व आहे हे त्यांनी स्पष्ट केले.तालुका विधी सेवा समितीचे संन्मानिय सदस्य अॕड.दवणे साहेब यांनी Right to children या विषयावर विद्यार्थ्यांशी हितगर्जू केले. ॲड.आगलावे यांनी Rte to Education 2009 संबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कायद्यातील बालक हिताच्या तरतुदी तसेच त्यांचे महत्त्व या विषयावर आपले मत व्यक्त केले.ॲड सावतकर यांनी “बेटी बचाव बेटी पढाओ” या सदराखाली स्री शिक्षणाचे महत्त्व व काळाची गरज या सर्व बाबींचा गुन्हेगारी तथा Juwenile Justice Act या विषयी अॕड भराडे यांनी विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या शेवटी अॕड.पाईकराव यांनी विद्यार्थ्यांशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा असणारा POCSO Act या विषयी सविस्तर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.या कायद्यातिल विविध कलमे,तरतुदी विद्यार्थ्यांना समजेल असे अगदी सोप्या भाषेत मांडल्या.

विविध व्याख्याने तथा चर्चासञाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची न्यायविषयक जाणीव निर्माण होण्यास निश्चितच या शिबिरामुळे मदत झाली. विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून त्यांच्या शंकाचे निरासन केले.या कार्यक्रमास संस्थेचे व्यवस्थापक आशिष लासिनकर,मुख्याध्यापक एम.पी.कदम,तथा शिक्षिका एस.एस.तिवरंगकर मंचावर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक रणजित चव्हाण यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व माध्यमिक शिक्षकवृंद तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य लाभले.