काळाने घातला घात पण वेळेने दिला साथ- भंडारातील प्रख्यात डॉ. श्रीपात दांपत्य थोडक्यात बचावले

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

भंडारा(दि. 23जुलै):- आज सकाळी जवळपास 8 वाजता डॉ. श्रीपात दांपत्य स्वतःच्या चारचाकी गाडीने जात असताना भंडारातील जिल्हाधिकारी कार्यालया अगदी सामोरा – समोर त्रिमूर्ती चौकात त्यांच्या चालत्या गाडीवर निंबाचं झाड कोसळून अपघात झाला परंतु काहीही जीवित हानी झाली नाही, डॉ. दांपत्य थोडक्यात बचावले. सविस्तर, भंडारा जिल्ह्यातून N H – 6 महामार्गावर त्रिमूर्ती चौक येथे चालत्या गाडीवर झाड कोसळला. गाडी क्रमांक MH-6 H 6630 असून गाडीमध्ये बसलेले दांपत्य डॉ. श्रीपात होते.अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झाली असताना सुद्धा डॉक्टर दाम्पत्याने परिस्थितीचा सामना केला.

काळ आला होता पण वेळ आली नव्हती ही मण डॉ. श्रीपात दाम्पत्याना जोडून येत आहे. राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे या अपघाताने जडवाहनाच्या ताफा, एस.टी. माहामंडळची बसेस व इतर प्रवासांच्या गाड्यांच्या रांगच- रांगा लागलेल्या होत्या. पूर्णपणे NH-6 भंडारा महामार्ग कोळंबलेला होता. पावसाचे दिवस असल्याने भविष्यात अशा महामार्गावर भयावह घटना होऊ नये म्हणून प्रशासनाने त्वरित लक्ष देणे महत्वाचे आहे, असे लोकमंडळीकडून बोलले जात आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED