आर. आर. मालपाणी मतिमंद शाळेचा नाविण्यपूर्ण उपक्रम

33

🔸विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा ; दर महिन्यात आरोग्य तपासणीही

✒️नांदेड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

नांदेड(दि.23जुलै):- शहराच्या मगनपुरा भागातील आर. आर. मालपाणी मतिमंद शाळा त्यांच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिकसह सर्वच क्षेत्रांत भरीव विकास व्हावा यासाठी दरवर्षी विविध उपक्रम राबवते या उपक्रमाचा पॅटर्न अन्य शाळेसाठी प्रेरणादायी ठरत आहे असाच आणखी एक नाविण्यपूर्ण उपक्रम या शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक नितीन निर्मल यांच्या मार्गदर्शनात राबवण्यात येत आहे यात शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांचा वाढदिवस त्यांच्या शाळेतील मित्र तसेच शिक्षकांच्या उपस्थितीत साजरा तसेच साथीचे आजार तसेच अन्य आजारांची वेळीच माहिती मिळाल्यास त्यांच्यावर वेळीच उपचार करणे सोपे होते यासाठी दर महिन्यात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीही करण्यात येत आहे. याच उपक्रमाअंतर्गत शनिवार दि. 23 जुलै रोजी योगेश पांचाळ या विद्यार्थ्याचा वाढदिवस तसेच शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी डॉ. सौ. शोभा अनिल तोष्णीवाल यांनी केली आहे.

या शाळेतील विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासह आपला विद्यार्थी भविष्यात स्वावलंबी होऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात यावा यासाठी नवनवीन उपक्रम राबवविले आहेत. यातून शाळेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी स्वावलंबी जीवन जगत आहेत. यासमवेतच आपल्या शाळेतील विद्यार्थ्यासह जिल्हा तसेच लगतच्या जिल्ह्यातील १८ वर्षाआतील मस्तिष्क रुग्णांसाठी वर्षात दोन वेळा या शाळेत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. गत दोन वर्ष कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा सुरु करता आली नाही. कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने यावर्षी जून पासून प्रत्यक्ष शाळेला प्रारंभ झाला आहे. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची आवड निर्माण व्हावी तसेच घरच्याप्रमाणे या विद्यार्थ्याचा त्यांचे मित्र व शिक्षकांच्या उपस्थितीत शाळेत वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दर महिन्यात मुलांच्या आरोग्याची तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. शनिवार दि २३ जुलै रोजी योगेश पांचाळ या विद्यार्थ्याचा वाढदिवस शाळेतील विद्यार्थी व सर्व कर्मचार्‍याच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यासमवेतच डॉ. सौ. शोभा अनिल तोष्णीवाल यांनी विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी केली. शाळेचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम अन्य शाळेसाठी प्रेरणादायक ठरत आहे.