धरणी चौक येथे गटारींना लोखंडी जाळी व पुलास कठडे बसवावेत……

🔹अखिल भारतीय संत सावतामाळी युवक संघ महाराष्ट्र राज्य, धरणगाव ची मागणी

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.23जुलै):- आपल्या धरणगाव शहरातील धरणी चौक येथील गटारीना लोखंडी जाळी व पुलास कठडे बसवावेत कारण त्या ठिकाणी पाणी वरून वाहते गटार दिसत नाही व शाळेचे मुले – मुली गटारीत वाहून जाण्याची मोठी शक्यता आहे . तेव्हा दुर्घटना होण्याच्या अगोदर ‘एखादा जीव जाण्याच्या अगोदर हे काम झाले तर बरे .. होईल . या ठिकाण वरुन खुप विद्यार्थी ये – जा करतात .

ह्या विषयावर तात्काळ प्रशासनाने दखल घेऊन लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय संत सावतामाळी युवक संघ महाराष्ट्र राज्य, धरणगाव यांनी निवेदनात नमूद केली आहे.

याप्रसंगी संघटनेचे विभागीय संघटक विनायक महाजन, जिल्हा संपर्कप्रमुख निलेश माळी, जिल्हा शोशलमिडीया प्रमुख जितेंद्र महाजन, शेतकरी आघाडी चे तालुका अध्यक्ष गजानन भाऊ महाजन , धरणगाव तालुका अध्यक्ष दिनेश महाजन तसेच समाजातील तरुण समाजबांधव उपस्थित होते.

धरणगाव, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED