सतीश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याची भेट

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.24जुलै):-बेलवडे हवेली तालुका कराड येथील समाजप्रिय माध्यमिक शिक्षक सतीश लक्ष्मण जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त कोळे तालुका कराड येथील जिजाऊ वस्तीगृहात शालेय साहित्य देण्यात आले.

बेलवडे हवेली येथील सुपुत्र समाजप्रिय माध्यमिक शिक्षक सतीश लक्ष्मण जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्यावतीने विविध उपक्रम राबवण्यात आले त्याचा एक भाग म्हणून कोळे तालुका कराड येथील जिजाऊ वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट देण्यात आले.

यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते प्रतिष्ठानचे संपतराव मोहिते, समाजप्रिय माध्यमिक शिक्षक सतीश लक्ष्मण जाधव, अनील बडेकर, संभाजीराव भोसले उपस्थित होते, स्वागत प्रास्ताविक समीर नदाफ यांनी केले तर आभार आनंदा बडेकर यांनी मानले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED