माळी समाज तर्फे ” गुणवंत विद्यार्थी – गुणगौरव सोहळा ” उत्साहात संपन्न !…..

🔹सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून मोठे अधिकारी व्हा. समाजाचे व शहराचे नावलौकिक करा – गुलाबरावजी वाघ

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.24जुलै):- शहरातील सावता माळी समाज सुधारणा पंच मंडळाच्या वतीने गुणवंतांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रास्ताविक माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही.टी. माळी यांनी केले.गुणगौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबरावजी वाघ होते. प्रमुख अतिथी म्हणून माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा माळी, सा.मा.शि.प्र.मं मंडळाचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पाताई महाजन, लहान माळीवाडा समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष निंबाजी माळी मा.सचिव दशरथ महाजन, सुखदेवअण्णा महाजन, कैलास माळी, एस.डब्ल्यू. पाटील, पत्रकार आर.डी महाजन, प्रा.कविता महाजन, सुभाष महाजन, सावता माळी प्रतिष्ठान जळगाव चे सोमनाथ महाजन, कैलास वाघ, रमेश गुरुजी, गोपाल महाजन, सखाराम महाजन उपस्थित होते.

या गुणगौरव सोहळ्यामध्ये माळी समाजातील १९० विद्यार्थ्यांचा ट्रॉफी सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यामध्ये एस.एस.सी परीक्षेत ७५ % पेक्षा जास्त गुण मिळविणारे ११० विद्यार्थी तर एच.एस. सी.परीक्षेत [ कला, विज्ञान ,वाणिज्य ] ६० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पदवी व पदव्युत्तर प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले २० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.गुणगौरव सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून आपापले अनुभव व्यक्त केले सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन पुढे मार्गक्रमण करा, नियमित अभ्यास करा हीच यशाची गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन केले. अक्षय सोनवणे याने रशियातला प्रवास सांगून माझ्या यशामागे माझ्या गुरुवर्यांचा व माझ्या मित्रांचा सहकार्यांमुळेच मी भारत देशाची मान उंचाऊ शकलो. तिरंगा अकॅडमीचे शिक्षक समाधान महाजन यांनी आपल्या महत्वाचे सगळ्यांना प्रोत्साहित केले. माळी समाज पंच मंडळाने आमच्यासाठी अभ्यासिका उपलब्ध करून दिली व शिक्षणाचे द्वार खुले करून दिले याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

कैलास माळी, प्रा.कविता महाजन, ज्ञानेश्वरजी महाजन यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा अभिनंदन व कौतुक केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ज्ञानेश्वरजी महाजन यांनी एस.एस.सी. व एच.एस.सी परीक्षेत प्रथम व द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात १००० रुपयांचे बक्षीस दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गुलाबरावजी वाघ यांनी देखील प्रत्येकी ५०० रुपये रोख बक्षीस दिले. रमेश तुकाराम माळी गुरुजी यांनी १० वी व १२ वी प्रथमसाठी दरवर्षी ५०१रू बक्षिस देण्याची जाहीर केले.गुलाबरावजी वाघ यांनी आपल्या मनोगतातून सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले व विद्येची खरे देवता सावित्रीमाई फुले हेच आपले प्रेरणास्थान आहेत. घराघरात तात्यासाहेबांचा व माईंचा फोटो हवा. शिवराय – फुले – शाहू – आंबेडकर हे आपले प्रेरणास्त्रोत आहेत. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा चा अभ्यास करून मोठे अधिकारी व्हा व समाजाचे, धरणगाव शहराचे नावलौकिक करा असे प्रतिपादन केले.

गुणगौरव सोहळ्याचे सूत्रसंचालन माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही.टी.माळी, सचिव गोपाल माळी यांनी केले तर आभार सल्लागार पंच एच.डी.माळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विनायक महाजन, नितेश महाजन, भैया भाऊ महाजन, गजानन महाजन, राजु महाजन, दिनेश माळी, कांतीलाल महाजन, आबा महाजन , अनिल महाजन, रवींद्र वऱ्हाडे, पी.डी.पाटील, तिरंगा अकॅडमीचे समाधान महाजन, निवृत्ती महाजन, कैलास माळी ( चोपदार ) तसेच माळी समाज पंच मंडळाचे सर्व सल्लागार पंच तसेच उपस्थित माळी समाज बांधव यांनी अनमोल सहकार्य केले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED