उमरखेड तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी अँड. विशाल कोत्तेवार यांची निवड

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 24 जुलै):-जिल्ह्यातील युवक काँग्रेसच्या वतीने येऊ घातलेल्या नगरपालिका तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने संघटनात्मक बांधणी करण्याच्या दृष्टीने जिल्हा युवक काँग्रेसकडून उमरखेड तालुका युवा काँग्रेस अध्यक्षपदी विडूळ येथील तरुण तडफदार कार्यकर्ते अँड विशाल कोत्तेवार यांची नियुक्ती करण्यात आली यापूर्वी त्यांनी युवक काँग्रेसच्या विधानसभा उपाध्यक्ष व विधानसभा सरचिटणीस पदाचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळला तसेच संघटनात्मक कार्याची पावती म्हणून जिल्हा युवक काँग्रेसने त्यांची उमरखेड तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

त्यांनी त्यांच्या नियुक्तीचे श्रेय युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, जिल्हा युवक अध्यक्ष उमेश पुरके, उमरखेड महागाव विधानसभा अध्यक्ष युवराज पाटील देवसरकर, उमरखेड उमरखेड पुसद युवक काँग्रेस प्रभारी पियुष राणे, माजी जीप अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर, प्रदेश सरचिटणीस तातू देशमुख, माजी आमदार विजय खडसे, माजी आमदार प्रकाश देवसरकर तालुका काँग्रेस अध्यक्ष दत्तराव शिंदे, यवतमाळ जिल्हा काँग्रेस सचिव गोपाल अग्रवाल, कृ.उ.बा.स.सभापती बाळासाहेब चंद्रे, यांना दिले आहे.

त्यांच्या नियुक्ती बद्दल माझी पंचायत समिती सदस्य प्रमोद देशमुख , माजी सभापती पं.स. प्रयाग बाई कोत्तेवार , माजी जीप सभापती छायाताई धुळध्वज, विडुळ सरपंच प्रभावती धोपटे, ग्रामपंचायत सदस्य अन्नपूर्णाबाई कोत्तेवार, माजी जि प सदस्य संदीप हिंगमिरे, माजी पं.स.सदस्य बालाजी आगलावे, आपला जिन प्रेस संचालक गणेश बेले, कृ.उ.बा.स. संचालक गजानन बोन्सले , माजी उपसरपंच मिलिंद धुळे तर उपसरपंच देमाजी काळबांडे , विडूळ तंटामुक्ती अध्यक्ष पंजाब भालेराव यांचे आभार मानले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED