अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित दिव्यांग शिबीराला गेवराईत मोठा प्रतिसाद

32

🔸दिव्यांगांना आधार देण्यासाठी शिबीराचे नियमीत आयोजन करणार – अमरसिंह पंडित

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.24जुलै):-अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या मोफत कृत्रिम हात व पाय शिबीरामध्ये गरजुंना मिळणार्‍या अवयवांमुळे ते भविष्यात स्वता:च्या पायावर उभे राहु शकणार आहेत. अमरसिंह पंडित यांनी यापुर्वी गरजुंना नेत्र शिबीराच्या माध्यमातुन दृष्टी दिली, करोना संकटाच्या काळात उपचारासाठी मदत केली, महाआरोग्य शिबीरातुन मोफत उपचार केले आणि आजच्या शिबीरातुन दिव्यांगांना हात व पाय देवुन खर्‍या अर्थाने पुन्हा उभे करुन न्याय दिला अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. शिबीराला मिळालेल्या प्रतिसादामुळे भविष्यात अशा शिबीरांचे नियमीत आयोजन करणार असल्याचे प्रतिपादन अमरसिंह पंडित यांनी केले. यावेळी व्यासपिठावर डॉ. नरेंद्र काळे, डॉ. सुरेश साबळे, विजयसिंह पंडित, मिलींद जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शारदा प्रतिष्ठान, गेवराई आणि साधु वासवाणी मिशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गेवराई शहरात मोफत कृत्रिम हात व पाय शिबीराचे आयोजन करण्यात आले. बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी आयोजित केलेल्या शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, साधु वासवाणी मिशनचे प्रोजेक्ट हेड मिलींद जाधव, सुशिल ढगे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. महादेव चिंचोळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कदम, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, जि.प.सभापती बाबुराव जाधव, जयभवानीचे व्हा. चेअरमन जगन्नाथ शिंदे, उप सभापती शाम मुळे, जि.प.सदस्य फुलचंद बोरकर, शहराध्यक्ष दिपक आतकरे, माजी सभापती कुमारराव ढाकणे, आप्पासाहेब गव्हाणे, सरवर पठाण यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

सामान्य माणसाच्या गरजेला उपयोगी पडणारे व्यक्तीमत्व म्हणुन अमरसिंह पंडित यांच्याकडे पाहिले जाते, बीड जिल्ह्यातील दिव्यांगांना आधार देण्याचे पवित्र कार्य त्यांनी या शिबीराच्या माध्यमातुन केले. यापुर्वी आरोग्य विषयक महाशिबीरांचे यशस्वी आयोजन करुन त्यांनी रुग्णसेवेचा वसा सुरु ठेवला होता. करोनाच्या संकटकाळात सुद्धा त्यांनी केलेल्या कामाची दखल जनता नक्कीच घेईल असे प्रतिपादन राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी आपल्या भाषणात अमरसिंह पंडित आणि शारदा प्रतिष्ठानच्या वैद्यकीय क्षेत्रातील कामांचा गौरव केला. साधु वासवाणी मिशनच्या वतीने सुशिल ढगे यांनी शिबीराच्या आयोजना बाबत अमरसिंह पंडित यांचे आभार व्यक्त केले.

या शिबीराला दिव्यांगांची झालेली गर्दी पाहुन मन गहिवरले आहे, या क्षेत्रात काम करण्यासाठी मोठा वाव असुन गरजुंची सेवा करण्याची ही मोठी संधी आहे. या शिबीराच्या माध्यमातुन खर्‍या अर्थाने दिव्यांगांना नवा अवयव मिळणार असुन या माध्यमातुन ते ताठ मानेने समाजात उभे राहणार आहेत. भविष्यात अशा शिबीरांचे नियमीत आयोजन करणार असल्याचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. या शिबीरात २७१ पात्र दिव्यांगांच्या अवयवाचे मोजमाप घेण्यात आले. पुढील महिण्यात त्यांना कृत्रिम हात व पायाचे वाटप केले जाणार आहे. कार्यक्रमाचे सुत्र संचलन माधव चाटे यांनी केले तर आभार भाऊसाहेब नाटकर यांनी मानले. कार्यक्रमाला दिव्यांगांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.