माळी समाजातर्फे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील यांचा सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन सन्मान

32

✒️धरणगांव प्रतिनिधी(पी.डी. पाटील)

धरणगांव(दि.25जुलै):- धरणगांव शहरातील श्री संत सावता माळी समाज सुधारणा मंडळ मोठा माळीवाडा धरणगाव यांच्या वतीने ” गुणवंत विद्यार्थी – गुणगौरव सोहळा ” या कार्यक्रमांतर्गत सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव चे आदर्श शिक्षक पाटील पी.डी.पाटील यांना मागील काळात राज्यस्तरीय महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार , खान्देशस्तरीय गुरूगौरव पुरस्कार, जिल्हास्तरीय समता शिक्षक पुरस्कार, जिल्हास्तरीय सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, मिळाल्याबद्दल माळी समाजातर्फे सन्मानचिन्ह – पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकसभेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबरावजी वाघ साहेब, सा.मा.शि.प्र. मंडळाचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष नानासो. ज्ञानेश्वरजी महाजन, माळी समाजाचे अध्यक्ष विठोबादादा माळी, उपाध्यक्ष निंबाजी माळी, सचिव गोपाल माळी, कोषाध्यक्ष व्ही.टी.माळी सर, लहान माळीवाड्याचे माळी समाज अध्यक्ष रामकृष्णदादा महाजन, ज्येष्ठ मार्गदर्शक सुखदेव आण्णा महाजन, माजी सचिव दशरथ महाजन, गटनेते तथा क्रीडाशिक्षक कैलास माळी सर, पत्रकार आर.डी.महाजन सर, कैलास वाघसर, मोठे बंधु आदर्श शिक्षक एच.डी.माळी सर व विनायक महाजन, नितेश माळी, राजू महाजन, गोपाल महाजन, महेंद्र माळी, गजानन महाजन, आबा महाजन, सखाराम महाजन, अनिल महाजन, सुभाष महाजन, तिरंगा अकॅडमी चे शिक्षक समाधान महाजन, ट्रेनर निवृत्ती महाजन, कैलास माळी तसेच माळी समाजातील सर्व ज्येष्ठ बांधव, गुणवंत विद्यार्थी , पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही.टी.माळी सर, सचिव गोपाल माळी तर आभार सल्लागार पंच हेमंत डी.माळी सर यांनी केले.