माजी खासदार,दलित मित्र,पर्यावरण मित्र स्व.वि.तु.नागपुरे यांचे जयंतीनिमित्त पया॔वरण दिन साजरा.

27

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(3जुलै) :–शिक्षण प़सारक म़डळ मूल चे संस्थापक अध्यक्ष कै.वि.तु.नागपुरे यांची जयंती नवभारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मूल येथे पर्यावरण दिन म्हणून साजरी करण्यात आली.

संस्थेचे अध्यक्ष अँड.बाबासाहेब वासाडे ,उपाध्यक्ष राममोहन बोकारे साहेब,सचिव अँड .अनिल वैरागडे यांच्या उपस्थितीत स्व.वि.तु नागपुरेजींच्या प्रतिमेला माला अर्पण केले.यापसंगी वडाच्या झाडाचे रोपन करण्यात आले.
व संस्था अध्यक्ष अँड.बाबासाहेब वासाडे यांची जिल्हा पर्यावरण समितीचे अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल नवभारत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.रमेश खडतकर यांनी बाबासाहेबांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला .
शाळेच्या शिक्षिका पर्यावरण सखी सौ.वर्षा भांडारकर यांनी स्वतः तयार केलेली गोडलिंबाचे रोप सौ.स्मिताताई बांडगे व अँलोव्हेराचं रोप श्री.उदय चौधरीयांना मागणीनुसार दिले.यापस़गी शाळा परीसरातत लिलीच्या बियाचे रोपन करण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रम हा सोशल डिस्टन्सिंग व तोंडाला मास्क लावून,सानिटायजर वापरुन करण्यात आला.स्थानिक प्रशासनाने परवानगी घेऊन अगदी साधेपणाने दलित मित्र कै.नागपुरेजी यांची जयंती विद्यालयातील शिक्षकांचे उपस्थितित साजरी करण्यात आली..