बोधिसत्व बुद्धविहारात बौद्धांचार्य,केंद्रीय शिक्षक,केंद्रीय शिक्षिका मेळावा उत्साहात संपन्न झाला

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.25जुलै):-दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा यवतमाळ जिल्ह्याचे वतीने जिल्हास्तरीय बौध्दाचार्य केंद्रीय ,शिक्षक शिक्षिका मेळावा यवतमाळ येथील बोधिसत्व बुध्दविहारात दि.24 जुलै 2022 रविवार रोजी दुपारी ठिक 12 ते 5 या वेळेवर आयोजित करण्यात आला होता.सर्वप्रथम तथागत भगवान बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमांचे पुजन पुष्पहाराने मेणबत्ती व अगरबत्ती प्रज्वलित करुन करण्यात आले. आणि सामुहिक त्रिसरण पंचशील वंदना घेण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रविजी भगत जिल्हाध्यक्ष यवतमाळ हे होते. भगवान इंगळे अध्यक्ष पूर्व यांनी बौध्दाचार्य केंद्रीय शिक्षक शिक्षिका आचार संहिता वर सविस्तर मार्गदर्शन केले . संघटनेची रचना व कार्यपध्दती व आपली जबाबदारी या विषयावर रुपेश वानखेडे जिल्हा सरचिटणीस यांनी भूमिका विषद केली. रवि भगत जिल्हाध्यक्ष यांनी विवाह संस्कार व विवाह विधि प्रात्यक्षिक सादर केले.यामध्ये मोहन भवरे व कुसुमताई भवरे यांचा प्रात्यक्षिक विवाह संस्कार विधि घेण्यात आला.सहभोजना नंतर नविन आव्हाने व शंका समाधान या विषयावर खुली चर्चा घेण्यात आली या मध्ये उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विचारलेल्या शंकाचे निरसन करण्यात आले.

यावेळी बोधिसत्व बुद्धविहाराच्या तिसऱ्या स्लॅब च्या नियोजनासाठी अनुक्रमे चित्तरंजन वंजारे- मिनाताई सुनिल धोंगडे-अर्णव शेंडे वर्ग 10 वीच्या गुणवत्ता प्राप्त बाबत हरिदास दुबे -ज्योती प्रितम शेंडे कडून डाॅ. ललित बोरकर- पुष्पलताताई सातपुडके- नरेंद्र भगत-नागोराव बनसोड-रमेश गजबे या सर्वांनी प्रत्येक 5000/₹ व स्वप्निल रवि भगत तर्फे 10,000/₹ देणगी दिली त्याबद्दल वरिल सर्वांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमातील नाव नोंदणी अरुण खंडारे, जिल्हा कार्यालयीन सचिव यवतमाळ यांनी केली. रवि भगत जिल्हाध्यक्ष यांनी अध्यक्षीय भाषण केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डाॅ. ललित बोरकर जिल्हा उपाध्यक्ष यांनी केले. आभार आद.रमेश तेलंग सरचिटणीस तालुका शाखा वणी यांनी मानले. सरणत्तय गाथेने सभेची सांगता करण्यात आली.

या मेळाव्याला वणी, मारेगाव, घाटंजी, यवतमाळ, दारव्हा, पुसद, महागाव, उमरखेड, आर्णी, कळंब इत्यादी तालुका शाखेचे अध्यक्षासह बौध्दाचार्य, केंद्रीय शिक्षक शिक्षिका हजर होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED