मोर्शी तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना १ लाख रुपये मदत देण्याची मागणी !

76

🔸राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी धडकले उप विभागीय कार्यालयावर !

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.25जुलै):-तालुक्यामध्ये मागील काही दिवसापासून पावसाने थैमान घातले आहे. ग्रामीण भागातील शेतीचे अक्षरश: तलावात रुपांतर झालेले असून पिकांचे पूर्णपणे नुकसान झालेले आहे, अशा परिस्थितीत मोर्शी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून संत्रा उत्पादक शेतकरी बांधवाना हेक्टरी १ लाख रुपये त्वरित मदत जाहीर करून मोर्शी तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली असून उप विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

गेल्या तीन वर्षापासून संत्रा पिकाची सुरू असलेली अधोगती आजसुद्धा कायम आहे. जून महिन्यामध्ये झालेल्या अत्यल्प पावसामुळे संत्राचा मृग बहार फुटला नाही, जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे संत्रा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, संत्राला बाजारात योग्य भाव मिळत नाही, अशी परिस्थिती असताना त्यातच आता एका अनोळखी रोगाने संत्रा पिकावर आक्रमण केले आहे. त्यामुळे मृग बहारात झाडाला लागलेली संत्री गळून पडत आहेत. यामुळे संत्रा उत्पादक हवालदिल झाले असून जवळपास रात्रभरात शेतातील झाडाखाली संत्री पडलेली दिसून येत आहेत. या प्रकारामुळे हातात आलेले लाखो रुपयांचे संत्रापीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अज्ञात रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने लाखमोलाच्या संत्र्याची माती होणे सुरू आहे.

याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभाग व संशोधकांच्या कानावर ही बाब घातली परंतु संशोधकांनी व अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताला भेटी देण्यास तीळमात्रही स्वारस्य दाखविले नसल्याने शेतकऱ्यांची ओरड कायम असून कृषी विभाग व संशोधकांच्या प्रति रोष निर्माण होतांना दिसत असून मोर्शी तालुक्यामध्ये संशोधकांचे मार्गदर्शन केंद्र सुरू करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, मागील काही दिवसापासून मोर्शी तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे. ग्रामीण भागातील शेतीचे अक्षरश: तलावात रुपांतर झालेले असून पिकांचे पूर्णपणे नुकसान झालेले आहे, अशा परिस्थितीत मोर्शी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून संत्रा उत्पादक शेतकरी बांधवाना हेक्टरी १ लाख रुपये त्वरित मदत जाहीर करून मोर्शी तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करणे, शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत.

शेतकऱ्याच्या पाल्यांना शालेय फी मध्ये सवलत देण्यात यावी, पिक विम्याची रक्कम संबंधित शेतकर्यांना विनाविलंब अदा करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके, युवक शहर अध्यक्ष अंकुश घारड, युवक तालुका अध्यक्ष हितेश साबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभागीय अध्यक्ष रुपेश मेश्राम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, नगर परिषद माजी उपाध्यक्ष मोहन मडघे, विलास ठाकरे, प्रफुल चिखले, संजय कळसकर, महादेव वाघमारे, निलेश महल्ले, विपुल हिवसे, निलेश अघाडे, शेर खान नन्हे खान, गजानन पोहकार, बाबाराव लुंगे, राहुल लांडे, दीपक मोहोड, यांच्यासह आदी मंडळी उपस्थित होती.