


✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.25जुलै):- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालेश्वर शाळेसाठी सर्व पालक व ग्रामस्थ नेहमीच सहकार्य भावनेतून सहकार्य करत असतात अमृत महोत्सवी स्वतंत्र दिनानिमित्त ‘ हर घर एक झेंडा’ या कार्यक्रमा निमित्त शाळा सुशोभीकरणासाठी सर्व पालक व ग्रामस्थ पुढे आलेत व एक दिवस सर्वांनी श्रमदान व येणारा सर्व खर्च स्वतः करून शाळेचा मोकळा परिसर कॉंग्रेटीकरण करण्याचे ठरविले. यानुसार ठरल्याप्रमाणे शाळेचा मोकळा परिसर सुमारे 2000 स्केवर फूट कॉंग्रेटीकरण करण्यात आले. यासाठी येणारा खर्च सुमारे रु. 30,000 असून ग्रामस्थ व पालकांकडून करण्यात आला.
उपस्थितीत, ग्रा. प. सरपंच भालेश्वर संदेश रामटेके , उपसरपंच शरद भागडकर, इ. सदस्य ग्रा. प. भालेश्वर, शाळेचे मुख्याध्यापक अनिल बावनकर , सहशिक्षक भारत वार , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल राऊत, उपाध्यक्ष चेतना प्र. भागडकर, ग्रामस्थ व पालक श्रीरामजी अलोणे, मोडकूजी नागपुरे, दिनकर राऊत, व गावातील उत्साही नवमंडळ सदस्य यांचा सहयोग लाभला.




