माजरी वस्ती, माजरी काॅलरी या भागात पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाले..- जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

30

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

मागील पंधरवड्यात अतिवृष्टीमुळे अप्पर वर्धा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या पुरामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागाला प्रचंड फटका बसला.भद्रावती तालुक्यातील माजरी वस्ती व माजरी काॅलरी या भागात चहूबाजूंनी पाणी घुसल्याने जनजीवन पुर्णतः विस्कळीत झाले. आज सकाळी आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या चंद्रपुरातील जनसंपर्क कार्यालयात माजरी वस्तीत राहणार्‍या ताराबाई बहुउद्देशीय महिला मंडळाच्या तीस ते चाळीस पुरपिडीत महिलाभगीनी मदतीच्या आशेने आल्या.लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे तुंरत महीला भगीनींच्या समस्या समजून घेतल्या. प्रसंगीच त्यांच्या अनेक समस्यांचे निराकरण केले. या महिलाभगिनींना अन्नधान्य किट व बँन्केटचे वितरण आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून लवकरच होणार आहे. यासोबतच रोहयोच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करू असे त्यांना सांगितले.

पुरामुळे माजरीत अनेक नागरी समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यांच्या सोडवणूकीसाठी स्थानिक ग्रामसेवकांना सुचना केल्या. पुरामुळे येथिल प्रा. आ. केंद्र पुर्णपणे पाण्यात होते. ते लवकरात लवकर सुरू करावे यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सुचविले. यासोबतच तातडीने आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी वेकोलि प्रशासनाने आरोग्य शिबीरं घ्यावी आणि वेकोलीचे रुग्णालय माजरीवासीयांना आरोग्यसेवेसाठी खुले करावे असे वेकोलिच्या महाप्रबंधकांना यावेळी सांगितले.याप्रसंगी, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष कु. अल्काताई आत्राम व प्रकाश धारणे सोबत होते.