✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी, तालुका प्रतिनिधी, मो:-8888628986)

ब्रह्मपुरी(दि:-3जुलै):-आदर्श गाव अड्याळ जिल्हा चन्द्रपुर येथे आज दिनांक 1/7/2020 ला स्व. माजी मुख्यमंत्रि वसंतराव नाईक यांची जयंती कृषि दिन म्हणुन साजरी करण्यात आली व 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान चालणाऱ्या आदर्श गाव जनजागृती ग्रामविकास सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मा. तपासकर साहेब,उपविभागीय कृषि अधिकरी हे होते तर मंडळ कृषि अधिकारी श्री खंडाले, कृषि पर्यवेक्षक सुमेध दहिवळे,कार्यान्वय यंत्रणा अक्षयसेवा संस्था सचिव सुधाकर महाडोरे, श्री गेडाम कृषि सहाय्यक, ग्रामपंचायत सदस्य श्री गिरिधर आलबनकर, रोजगार सेवक नवनाथ नवघडे, कृषी मित्र विनोद वासनिक आदी मान्यवर उपस्थित राहुन मार्गदर्शन केले.
श्री तपासकर साहेब यांनी वसंतराव नाईक यांचे जिवन कार्यावर प्रकाश टाकला व कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली त्यानंतर येथिल प्रगत शेतकरी व आदर्श गाव ग्राम कार्यकर्ता नितेश आदे यान्चे शेतावर जाउन मत्स्य शेती, शेततळे, कुक्कुट पालन आदि कामाची पाहणी केले.
वरील सर्व कार्यक्रम करोना पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर व मास्क लावून करण्यात आला,
प्रास्ताविक सुमेध दहिवले यांनी व आभार सुधाकर महाडोरे यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी सुनिता भोयर, नितेश आदे, जगदीश शेंडे, विनोद वासनिक, शांताबाई भानारकर यांनी परिश्रम घेतले.
(कृपया सदर वृत्त आदर्श गाव मासिकात प्रकाशित ही विनंती)

कृषिसंपदा, पर्यावरण

©️ALL RIGHT RESERVED