कारगिलचा विजय आजही प्रेरणादायी – आ.डाॅ.रत्नाकर गुटटे इसाद येथे कार्यक्रम… भर पावसात वीरांचं स्मरण

29

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.26जुलै):- पाकिस्तानच्या ताब्यातून कारगिलचा भाग सोडविण्यासाठी तब्बल ६० दिवस चाललेल्या युध्दामध्ये भारतीय वीरपुत्रांनी जीवाची बाजी लावली. त्यामुळेच २६ जुलै १९९९ रोजी पाकिस्तानचा पराभव झाला होता. देशासाठी आपलं बलिदान देणारे असे युवक हिचं आपल्या देशाची संपत्ती आणि गौरव आहेत. उन, वारा, पाउस याची पर्वा न करता देशाच्या सेवेसाठी सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांमुळेच आपण सुरक्षित आहोत, याची जाणीव प्रत्येक भारतीयास असणे गरजेचे आहे. सुमारे २३ वर्षापूर्वी झालेला कारगिल युध्दाचा थरार आजही गौरवाने सांगितला जातो. म्हणूनचं कारगिलचा विजय आजही प्रेरणादायी आहे, असे मत गंगाखेड विधानसभेचे कर्तव्यदक्ष आ.डाॅ.रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केेले.

कारगिल दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील ईसाद येथील ग्रामपंचायत सभागृहात आयोजित केेलेल्या शूरवीरांना अभिवादन या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रम संपेपर्यंत सतत पाऊस सुरू होता परंतु त्याचा कार्यक्रमावर कुठलाही परिणाम न होऊ देता भर पावसात देखील येथील तरुण, विद्यार्थी व नागरिकांचा उत्साह वाकण्याजोगा होता. यावेळी अध्यक्ष सरपंच सविताताई उध्दवराव सातपुते, ह.भ.प. निवृत्तीनाथ महाराज इसादकर, कॅप्टन संजय कदम, सुभेदार मुंजाभाऊ कदम, सुभेदार गोपाळ पौळ, माजी सरपंच भगवानराव सातपुते, उध्दवराव सातपुते, पोलिस पाटील अशोकराव भोसले, डिंगबर आबा सातपुते, राजेभाऊ सातपुते, भोजराव सातपुते, हवलदार गंगाधर सूर्यवंशी, व्यासपीठावर होते.

पुढे बोलताना आ.डाॅ.गुट्टे म्हणाले की, केवळ एक दिवस वीरांचं स्मरण करून चालणार नाही. तर प्रत्येक घरात देशप्रेमी युवक तयार व्हायला हवेत. त्यासाठी सोशल मिडीयात अडकलेल्या तरूणांना देशभक्तीचे धडे देणारे अभ्यासक्रम विद्यापीठांनी तयार करायला हवेत. आज केंद्र सरकारने सुरू केलेल्या अग्नीवीर या योजनेस युवकांचा मिळणारा उत्स्फूर्त सहभाग देशभक्तीचं दर्शन देणारं उदाहरण आहे. सीमेवर देशसेवा करणा-या सैनिकांच्या कुटुंबाचा आदर करणे आपलं कर्तव्य आहे. हेही या निमित्ताने समजून घेतलं पाहिजे.

भर पावसात चाललेला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभेदार विश्वनाथ सातपुते, प्रकाश डिकळे, रामकिशन भोसले, पिंटू भोसले, नितीन भोसले, नरहरी भोसले, श्रीधर सातपुते, अंकुश भोसले, रमेश भोसले, विकास भोसले, उत्तम भोसले, राॅयल अ‍ॅकडमी, बालाजी विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळा यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी विठ्ठल सातपुते तर आभार प्रभाकर सातपुते यांनी व्यक्त केले.