आॕनलाईन पध्दतीने झाडी शब्दसाधक दिवस

29

🔹 झाडीबोली साहित्य मंडळाचा उपक्रम

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपुर(दि:-3 जुलै):-एक जुलै रोजी पहिला झाडी शब्दसाधक दिवस म्हणून साजरा करण्यात आला. झाडीबोली साहित्य मंडळाचे संस्थापक डाॕ. हरिश्चंद्र बोरकर यांनी झाडीपट्टी शब्दसाधक ग्रंथाच्या प्रकाशनाप्रसंगी दरवर्षी झाडी शब्दसाधक दिवस साजरा व्हावा , अशी इच्छा व्यक्त केली होती . त्यानुसार काल १ जुलै ह्या दिवशी झाडी शब्दसाधक दिवस साजरा करण्याबाबत झाडीबोली साहित्य मंडळ केंद्रीय समितीने मान्यता दिलेली होती. विशेष म्हणजे ह्या दिवशी झाडीपट्टीतील ज.गो.संत , जगदिश कुंभरे , हिरामण लांजे , बापुराव टोंगे ,पत्रूजी खोब्रागडे , गंगाधर कुनघाडकर , रमेशकुमार गजबे, रामभाऊ कपले, जगदीश कुंभरे, वामनराव गजभीये , जागेश्वर कोरेकार , गोकुलदास मेश्राम , सुधाकर मार्गोनवार , शंकर जवादे, प्रियंकला मेश्राम , दौलतभाई पठाण , अंताराम गिर्हेपुंजे , चुडाराम बल्लारपुरे ,क.ब.पेंदे , काशीनाथ नागोशे , चंद्रमणी भडके , युवराज गंगाराम, वसंत चन्ने , सुरेश डांगे, राजेंद्र घोटकर इत्यादी २५ झाडीसाहित्यिकाचा जन्मदिवस आहे ..जगात अन्य दिवस होतात पण साहित्यिकाचा दिवसमात्र साजरा केला जात नाही तथापी झाडीबोली साहित्य मंडळ यापुढेही दरवर्षी हा झाडीशब्द साधक दिवस निश्चितपणे मोठ्या स्वरूपात साजरा करणार आहे. यावर्षी कोरोना च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनेप्रमाणे प्रत्यक्ष कार्यक्रम न घेता यावर्षी आॕनलाईन पध्दतीने काल चारही जिल्ह्यात शाखास्तरावर हा दिवस साहित्य लेखन वाचन कृतीने साजरा करण्यात आला आहे.
यानिमित्ताने ज्येष्ठ साहित्यिक डाॕ. हरिश्चंद्र बोरकर, यावर्षीचे संमेलनाध्यक्ष डाॕ. गुरूप्रसाद पाखमोडे , ज्येष्ठ साहित्यिक लखनसिंह कटरे यांचे विशेष मनोगत आॕडीओ स्वरूपात आॕनलाईन पध्दतीने झाले तर समारोपीय भाषण झाडीबोली फेसबुक पेजवर रौप्य महोत्सवी झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बंडोपंत बोढेकर यांनी केले.तसेच झाडीबोली साहित्य मंडळाच्या परीवारातील सर्व साहित्यिक,लेखक,कवी, नाटककार ,नकलाकार,चित्रकार तसेच इतर मान्यवरांनी आपल्या स्तरावर कालचा १ जुलै हा दिवस झाडी शब्दसाधक दिन म्हणून व्हॕटसॲप च्या माध्यमातून,काहिनी गायन करून साजरा केलेला आहे. एकूण ३१ मान्यवरांनी व्हॕटसॲप समूहात कविता,चारोळी ,गीत,लेख सारखे लेखनकृती केलेली आहे .ह्या सर्व सहभागी साहित्यिक मंडळींना लवकरच सहभाग प्रमाणपत्र आॕनलाईन देण्यात येईल. झाडीबोली साहित्य मंडळ केंद्रीय समितीचे कवी हिरामणजी लांजे आणि बापुरावजी टोंगे यांचा काल ७५ वा वाढदिवस होता, त्यांना पहिल्या झाडी शब्दसाधक दिवसाच्या मंगलमयी दिनी मनःपूर्वक शुभकामना देण्यात आल्यात .तसेच झाडीपट्टीतील गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खास. अशोक नेते यांची ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी भेट घेऊन पहिल्या शब्दसाधक दिवसाची माहिती दिली .खा. नेते यांनी झाडीबोली साहित्य मंडळाची भूमिका ऐकून घेऊन बोलीच्या चळवळीसाठी शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी त्यांना बोढेकर यांनी आपले झाडीबोली चळवळीचे सिंहावलोकन हे पुस्तक भेट दिले. व्हॕटसॲप समुहात सहभागी झालेले कवी मारोती आरेवार, प्रशांत भंडारे ,कवयित्री कुसुमताई अलाम, मुरलीधर खोटेले, दिलीप पाटील, विरेनकुमार खोब्रागडे ,डाॕ.धनराज खानोरकर, रवी आत्राम,परमानंद जेंगठे,डाॕ.तीर्थराज कापगते,रमेश कुडमेथे,पंडीत लोंढे,नागेंद्र नेवारे, किशोर चलाख, राजेंद्र घोटकर,सुनील पोटे, संतोषकुमार उईके, रामकृष्ण चनकापुरे ,दुशांत निमकर, विजयकुमार मेश्राम, रेणुका पांचाळ,कवयित्री अर्जुमन शेख,दिनेकुमार अंबादे, सुनील बावणे, मालती सेमले, सारीका जेणेकर तसेच चंद्रपूर जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष अरूण झगडकर व गडचिरोली जिल्हाध्यक्ष डाॕ. चंद्रकांतजी लेनगुरे आणि सर्व सदस्यगणांनी साहित्यसेवेचा दृढ संकल्प सोडला.