महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त राजगुरुनगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

✒️राजगुरुनगर प्रतिनिधी(मनोहर गोरगल्ले)

राजगुरुनगर(दि.२७जुलै):-महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त राजगुरुनगर व परीसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाला अँड. गणेश सांडभोर शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक, अविनाश मुलूक, संकेत खुटवड, नवनाथ कोतवाल, अक्षय कौधरे, सचिन राठोड, रोशन राठोड, दिलीप कांबळे आदी शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अॕड.गणेशशेठ सांडभोर शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक व माजी तालुका प्रमुख यांनी केले होते.

वृक्षा रोपन कार्यक्रमा निमित्ताने पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना सर्व पदाधिकारी व शिवसैनिक यांनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व आपले विचार व्यक्त केले. वृक्षारोपण कार्यक्रमात एकुण १५१ वृक्ष वाटप व लागवड करण्यात आली.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED