शेळीला शोधताना संरक्षक कुंपणाचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

🔸गेवराई तालुक्यातील अर्धामसला येथील दुदैवी घटना

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.28जुलै):-तालुक्यातील अर्धामसला येथील शेतकऱ्यांनी रानडुक्करापासून संरक्षण मिळावे यासाठी ऊसाला लावलेल्या संरक्षक तारेतील विद्युत प्रवाहाचा धक्का बसून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. नंदू उद्धव थोपटे ( ४० ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. यात एका शेळीचा देखील शाॅक लागून मृत्यू झाला आहे.

नंदू उद्धव थोपटे मंगळवारी आपल्या शेतात काम करून सायंकाळी घरी परत येत होते. सोबत असलेली शेळी उसाच्या शेतात गेली. तिला पाहण्यासाठी नंदू शेतात गेले. मात्र, उसालाचे रानडुक्करापासून संरक्षणासाठी लावलेल्या तारेतील विद्युत प्रवाहाचा त्यांना शॉक लागला. यात त्यांचा मृत्यू झाला. शेतात गेलेल्या शेळीचा देखील शाॅक बसून मृत्यू झाला आहे. नंदू थोपटे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED