पत्रकारांना मिळाले दहा लाख रुपये अपघाती विम्याचे कवच

🔸दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघ (अधिकृत) चा पुढाकार

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.28 जुलै):-भारतीय डाक विभागाने टाटा एआयजीच्या अपघात संरक्षण विमा या योजनेशी करार करुन प्रति वर्ष रुपये 399 च्या हप्त्यात विमाधारकास 10 लाख रुपयांपर्यंतच्या विम्याचे कवच देण्याची योजना आखली आहे.

या अंतर्गत औदुंबर पत्रकार बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघ अधिकृत च्या सर्व पत्रकार सदस्यांना या योजनेअंतर्गत विम्याचे कवच प्राप्त झाले आहे.

सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना नेहमी उचलून शासन दरबारी न्याय मिळवून देण्यात पत्रकार अग्रेसर असतो पण वार्तांकन करत असताना व सामाजिक जीवनात वावरत असताना अपघाती विम्याचे कवच त्यांनाही मिळावे यासाठी दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली व नुकतेच डाक विभाग व टाटा एआयजी कंपनीच्या वतीने अपघाती विम्याची योजना कार्यान्वित झाली यानुसार संघाचे अध्यक्ष अझरउल्ला खान व सचिव लक्ष्मीकांत नंदनवार यांनी तात्काळ या विषयावर अंमलबजावणी करत विनाविलंब पत्रकार बांधवांचा अपघाती विमा उतरविण्याच्या दिशेने पावले उचलली. त्यानुसार आज दिनांक 27 जुलै रोजी डाक विभागाच्या सहकार्यामुळे संघातील सर्व पत्रकार सदस्यांचा अपघाती विमा उतरविण्यात आला.

विमाधारकाचा अपघाती मृत्यु, अपंगत्व किंवा कायमचे आंशिक अपंगत्व आल्यास 10 लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण, शिवाय अपघातामुळे रुग्णालयात दाखल झाल्यास 60 हजार रुपयांपर्यंतचा खर्च आणि रुग्णालयात दाखल न होता घरी उपचार घेतल्यास 30 हजारांपर्यंत दावा देखील करता येणार आहे.

त्याच बरोबर रुग्णालयाच्या खर्चासाठी 10 दिवस प्रति दिन एक हजार रुपयेदेखील मिळतील. कुटुंबाला वाहतुकीसाठी 25 हजार रुपया पर्यन्त खर्च देखील मिळणार आहे.

कोणत्याही कारणाने अपघाती मृत्यु झाल्यास अंत्यसंस्कारासाठी 5 हजार व विम्याअंतर्गत किमान दोन मूलांच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपयांपर्यतची रक्कम मिळणार आहे.

संघटनेचे अध्यक्ष अझरउल्ला खान सचिव लक्ष्मीकांत नंदनवार यांचे सह निळकंठ धोबे, प्रशांत भागवत, वसंतराव देशमुख,विशाल माने, अविनाश मुन्नरवार, व्यंकटेश पेन्शनवार, शैलेश ताजवे, अंकुश पानपट्टे, गजानन भारती , शिवचरण हिंगमिरे, प्रदीप इंगोले, संजय देशमुख, सलमान अशर खान, ताहेर मिर्झा , सागर शेरे, रवी भोयर आणि अजय कानडे यांचा दहा लाख रुपयाचा अपघाती विमा संघटनेच्या पुढाकारातून काढण्यात आला आहे.

सदर विमा काढण्यासाठी पोस्ट मास्तर – व्‍यंकटी जोगदंड, डाक सहाय्यक – रमेश मुरमुरे , प्रकाश आगोसे , निळकंठ वानखेडे पोस्टमन टी. एस. पठाण, बालाजी जामकर , सचिन मांगुळकर, सुरज साखरे, सुधीर इंगोले ,अतुल मांगुळकर , जीडीएस – शिव घोसे, आचल पाटील, धीरज राठोड , भास्कर वानखेडे, देवसरकर यांनी विशेष शिबिर आयोजित करून विम्याचे कवच प्राप्त करून दिले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED