शेतीमालाचे हमीभावासाठी केन्द्र सरकारने कायदा करावा म्हणून ३१ जुलै रोजी पळसवाडी येथे रस्ता रोको

32

✒️औरंगाबाद(पुरोगामी न्युज नेटवर्क)

औरंगाबाद(दि.29जुलै):-देशातील शेतकऱ्यांना आत्महत्या मुक्त करून,त्यांच्या कष्टाचा संपूर्ण मोबदला देण्यासाठी, शेती मालाचे हमी भावाचा कायदा विनाविलंब करावा म्हणून,३१ जुलै रोजी खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथे रस्ता रोको आंदोलन केले जाणार असल्याची माहिती, जय किसान आंदोलन – स्वराज अभियान चे जिल्हाध्यक्ष साथी कासम भाई यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

हमी भावा बाबत केन्द्र सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, त्याचे विरोधात राष्ट्रीय स्तरावर ३१ जुलै रोजी चक्का जाम आंदोलनाची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली, पळसवाडी येथील रस्ता रोको त्याचाच भाग असल्याचे पत्रकात नमुद केले आहे.

रस्ता रोको आंदोलनात या मागण्याचा ही अंतर्भाव आहे……
शेतकरी आंदोलनाने पंतप्रधानांना ३ कृषी कायदे रद्द करायला भाग पाडले, ते कायदे मागील दरवाज्याने पुन्हा आणता कामा नयेत, जगण्यासाठी सरकारी जमिनीवर केलेली अतिक्रमण नियमित करा, उदर निर्वाहाचे साधन म्हणून अमानुष प्रथामध्ये अडकलेल्या , बालश्रमिक, गटारामधील कामे, देवदासी प्रथा.. इ, मागासवर्गीयांची तात्काळ मुक्तता करून त्यांचे संपूर्ण पुनर्वसन करा, ग्रामीण व असंघटीत कष्टकरी व मनरेगा कामगारांचे किमान वेतन चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्या प्रमाणे (कायद्याने) व्हायला हवे, महिलांना किमान – समान वेतन न देणाऱ्याना कठोर शासन करा., प्रत्येक नागरिकास, घटनेचे कलम २१ जर जगण्याचा हक्क प्रदान करीत असेल तर मग, रोजगाराचा हक्क/ कायदेशीर वेतन/ अन्न सुरक्षा/ संपूर्ण शिक्षण व आरोग्य सुविधा मोफत व दर्जेदार/ म्हातारपणासाठी पेन्शन आणि हक्काचे घर.. या सर्व बाबी घटनेच्या मूलभूत अधिकाराचा भाग बनवा इत्यादी मागण्याचा ही सामावेश आहे.

या रास्तारोको आंदोलनात विविध संघटनांची नेते मंडळी सहभागी होत आहेत, ज्यात प्रामुख्याने साथी सुभाष लोमटे ( सरचिटणीस) महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ, / अड. सुभाष सावंगीकर, साथी छगन गवळी, ( मराठवाडा लेबर युनियन), अड. विष्णू ढोबळे ( समाजवादी जन परिषद), सुबेदार मेजर सुखदेव बन ( श्रमिक मुक्ती दल), प्रा. श्रीराम जाधव व डॉ. प्रदीप खेलुरकर ( औरंगाबाद सर्व्योदय मंडळ), अड. आसाराम लहाने पाटील ( जनता दल – से) , साथी रामचंद्र काळे, साथी ज्ञानेश्वर वाघचौरे ( जय किसान आंदोलन – स्वराज अभियानचा समावेश असणार आहे.