सनशाईन स्कुल, कारंजा च्या वतीने कारगिल विजय दिवस साजरा

82

✒️कारंजा घाडगे,प्रतिनिधी(पियुष रेवतकर)

कारंजा(घा)(दि.30जुलै):-स्थानिक सनशाईन स्कुल कारंजा च्या वतीने 26 जुलै कारगिल विजय दिवस चे औचित्य साधून, विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत व्हावी तसेच आपल्या देशासाठी प्राणाची आहुती देणारे तसेच देश रक्षणार्थ दिवस रात्र झटणाऱ्या सैनिकांप्रति त्यांचे बालमनात आदर निर्माण व्हावा या दृष्टीने विविध देशभक्ती गीतावर सादरीकरण करण्यात आले यावेळी अमर जवान ची प्रतिकृती तयार करून सैन्यातुन सेवानिवृत्त कारंजा वासी गजानन चौधरी व संदीप तिवारी व शाळेचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक प्रेम महिले यांचे हस्ते ज्योत प्रज्वलित करून , अमर जवान प्रतिकृती चे पूजन करण्यात आले व विद्यार्थ्यांनी शाहिद जवान वर आधारित नाटिका व देशभक्ती गीतांवर नृत्य सादर केले.

प्रसंगी प्रेम महिले यांनी विद्यार्थ्यांना सदैव सैनिकांचा आदर करावा व देशाप्रती आपल्या कार्यातून तत्पर राहावे असे आवाहन केले तसेच वृक्षारोपण वर आधारित नृत्य सादर करण्यात आले तसेच 26 जुलै चे औचित्य साधून शालेय परिसरात 26 वृक्षांचे रोपण करण्यात आले या प्रसंगी विलास वानखेडे, संस्थापक, वृक्षमित्र परिवार यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व त्यांनी वृक्ष संवर्धन करीता 10 ट्री गार्ड दिले. आयोजनाकरीता सर्व शिक्षक , शिक्षिका, पालक, कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले.