राज्याचे माजी अर्थमंत्री विकास पुरुष सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांचा सत्कार

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.30जुलै):- माजी अर्थमंत्री,नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा चे वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.आणि कोरोना काळात गावातील लोकांना सेवा देणाऱ्या रुग्णालयातील डॉक्टर चांदेकर साहेब व परिचारिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी परिचारिका तसेच मागील चार पाच वर्षापासून तालुक्यात शेतकरी वर्गाला विविध प्रकारच्या मदती व शेतकऱ्यानं साठी काम करणारे अंबुजा सिमेंट फाऊंडेशन चे तालुका समन्वयक दिपक साळवे यांचा सत्कार करण्यात आला. शेतकऱ्यांना मार्गदर्शन व संसाधने पुरविण्यात मोलाचं योगदान आहे.

त्या निमित्याने या सर्व मान्यवरांचे तालुक्यातील भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने व नागरिकांकडून सत्कार करण्यात आला.या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा महामंत्री महेश देवकते,तालुका महामंत्री दत्ता राठोड,केशव गिरमाजी तालुका अध्यक्ष,राजेश राठोड, सुरेश केंद्रे,तुकाराम वारलवाड,उत्तम पवार,विजय गोतावले,गोविंद टोकरे,दत्ता कांबळे,गोपीनाथ चव्हान,माधव कुळसंगे,बंशी जाधव,प्रेम राठोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेश राठोड यांनी केल

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED