ग्राम दर्शन विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय खडसंगी येथे शालेय मंत्रिमंडळाची स्थापना

32

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.30जुलै):-शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांच्या मनात लोकशाहीची जाणीव निर्माण व्हावी वआजचे विद्यार्थी उद्याचे सुजाण,कार्यतत्पर, सशक्त नागरिक घडावे ही जाणीव ठेवून ग्राम दर्शन शिक्षण मंडळ चंद्रपूर ( कार्यालय अमरपुरी) द्वारा संचालित ग्राम दर्शन विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय खडसंगी येथे प्राचार्य श्री सदाशिव मेश्राम यांचे मार्गदर्शनात शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली.

याप्रसंगी शालेय निवडणूक आयुक्त म्हणून प्रा.श्री सातपुते सर , उपायुक्त म्हणून श्री कोकाडे सर,निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून श्री मडावी सर, बोरकर सर, निखारे सर तथा सर्व वर्ग शिक्षक, शिक्षिका यांनी काम पाहिले.विद्यार्थ्यांना निवडणुक प्रक्रियेची माहिती व्हावी म्हणून निवडणूक प्रत्यक्ष ballet unit व control unit मोबाइलद्वारे app तयार करून घेण्यात आली. यावेळी श्री विनोद भाऊ रणदिवे ( केंद्राध्यक्ष), श्री डी. आर मारेकर( निवडणूक अधिकारी क्र.१ , कू. एस. एन. पिंपळे ( निवडणूक अधिकारी क्र.२) श्री आशिष मेश्राम ( निवडणुक अधिकारी क्र.३) म्हणून काम पाहिले.

मुख्यमंत्री म्हणून विनीत राजेंद्र नागोसे वर्ग १२वां तथा उप मुख्यमंत्री म्हणून प्रेम श्रीरामे वर्ग १० वा हे निवडून आले. त्यानंतर मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांनी पदाची शपथ घेतली व शालेय शिक्षण मंत्री, आरोग्य मंत्री, सांस्कृतिक मंत्री, पर्यावरण मंत्री, क्रीडा मंत्री इत्यादी मंत्र्यांची निवड करून मंत्री मंडळाची स्थापना केली.प्राचार्य सदाशिव मेश्राम यांनी नवनियुक्त शालेय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच सर्व मंत्री यांना पुष्गुच्छ देऊन त्यांचा सत्कार व अभिनंदन केले.निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्याकरिता सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.संपूर्ण प्रक्रियेचे संचालन व आभार प्रा. सातपुते सर यांनी केले.