


✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमुर(दि.31जुलै):- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनेगाव (बे.) केंद्र- गदगाव येथील सहाय्यक शिक्षक प्रकाश कोडापे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शेडेगावला कार्यरत असताना अनेक उपक्रम राबविले, त्यातील एक अनोखा उपक्रम म्हणजे गरीब होतकरु विद्यार्थीनी कु.मोनिका रामलाल जयस्वाल हीच्या नावाने मासिक शंभर रुपये जमा करत होते. त्यांची बदली सोनेगाव (बे)शाळेला झाली, तरी त्यांनी स्वत: बॅंकेत जाऊन दर महिन्याला पैसे भरत होते .पाच वर्षा नंतर आर. डी. विड्राल झाली. मिळालेले पैसे खर्च होतात म्हणून पुढील शैक्षणिक कार्यासाठी उपयोगात यावे यासाठी मिळालेली एकुण रक्कम दहा हजार रुपये पाच वर्षांसाठी फिक्स डिपाजित ठेवन्यात आले.
विशेष मुदतबंद ठेवीची पावती प्रकाश कोडापे स्वत:कु. मोनिका रामलाल जयस्वाल हीच्या आईला शेडेगावच्या शाळेत जावून दिली, त्या वेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा संगीता गुडधे, शाळेच्या मुख्याध्यापिका अल्का महाकाळकर मॅडम, यशंवत शंभरकर सर,आनंद पाटील सर, जया झाडे मॅडम ,मनिषा रामलाल जयस्वाल व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.”फुल नाही फुलाची पाकडी” दिल्या बद्दल शिक्षकाच्या मनाला आनंद वाटला.विद्यार्थी प्रिय असल्यामुळे दर वर्ष विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देत असतात हे विशेष!




