विवेक कुचेकर चौसाळा जिल्हा परिषद गटातुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रबळ दावेदार

31

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.31जुलै):- तालुक्यातील चौसाळा जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जातीसाठी राखीव असुन या गटात जातीय समिकरण असो किंवा सामाजिक समीकरण असो सगळयाच परिस्थितीत विवेक कुचेकर हा तरूण प्रभावी ठरतो त्यांनी सामाजिक पातळीवर काम करत असताना संघटन अतिशय मजबुत केले आहे तसेच सर्वच पक्षात त्यांनी संबध जोपासले आहेत.सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी लोकोपयोगी कामे अतिशय प्रभावी पणे केली आहेत
सध्याच्या परिस्थितीत चौसाळा जिल्हा परिषद गटात प्रभावी दलित चेहरा दिसुन येत नसल्यामुळे विवेक कुचेकर यांची दावेदारी प्रभावी समजली जात आहे .


राष्ट्रवादीचे उच्चशिक्षित उमेदवार विवेक(बाबा)कुचेकर

जिल्हा परिषद निवडणुकीचे आरक्षण जाहीर होताच चौसाळा जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी कडुन उच्चशिक्षित तरूण आणी हक्काचा उमेदवार म्हणून विवेक (बाबा)कुचेकर यांच्याकडे पाहील जात आहे येणारया काळात त्यांच्याकडुन गोरगरिबांना न्याय मिळु शकतो या दृष्टीने त्यांच्याकडे नागरिक पाहत आहेत पक्ष नेत्याच्या उमेदवारीवर शिक्का मुहूर्त करून जनतेला हक्काचा चळवळीतील उच्चशिक्षित उमेदवार विवेक कुचेकर यांच्या रूपाने दयावा अशी मागणी होताना दिसत आहे.

 


पक्षाचा व आदरणीय आमदार संदीप क्षीरसागर व लोकनेते डॉ बाबु जोगदंड यांचा आदेश आणी संधी मिळाली तर ….

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन जर मला संधी मिळाली तर चौसाळा जिल्हा परिषद गटाचा चेहरा मोहरा बदलुन टाकुत आणी नागरिकांना हक्काचा माणूस असल्यासारखे काम करेल आज पंर्यत प्रत्येक सामाजिक कार्यात मी पुढेच आहेच यापुढे देखील राहील आणी गोरगरीब वंचित जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील.