भोसरी शाळांतील दहावी गुणवंत विद्यार्थी व मुख्याध्यापक यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

30

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे(दि.30जुलै);- नक्षञाचं देणं काव्यमंच, महाराष्ट व अभिनव एज्युकेशन ट्रस्ट,भोसरी यांच्या संयुक्तविद्यमाने भोसरी परिसरातील ५० शाळांमधील प्रथम पाच क्रमांक व मुख्याध्यापक यांना सत्कार सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला.हा सोहळा अंकुशराव लांडगे नाट्यगृह,भोसरी.पुणे येथे उत्साहात साजरा झाला.

कार्यक्रमाचे उदघाटन सरस्वतीपूजन व दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रा.राजेंद्र दशरथ सोनवणे (अध्यक्ष-नक्षञाचं देणं काव्यमंच), प्रा.रेवण कदम(अध्यक्ष अभिनव एज्युकेशन,ट्रस्ट ,भोसरि),युवा उद्योजक मोहन कुदळे,तज्ञ कौन्सलर प्रा.शरद शिंदे,मुख्याध्यापक संभाजी पडवड, मुख्याध्यापक प्रवीण गायकवाड, राज पाटील,प्रा.कुंदनसिंह ठाकूर, रणधिर मेहर,यशवंत गायकवाड,सौ.अनिता बिराजदार, साईराजे सोनवणे ,इ.मान्यवर उपस्थित होते.

दहावी नंतर आपला महत्वाचा टप्पा सुरु होतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी व जीवनात यशस्वी होण्यासाठी आपण वेळेचे नियोजन आणि सातत्यपूर्वक अभ्यास केल्यास यश मिळविता येते.असे आपल्या मनोगतात अभिनव एज्युकेशन ट्रस्ट अध्यक्ष प्रा.रेवण कदम यांनी मनोगत व्यक्त केले.

तज्ञ कौन्सलर, शिक्षणतज्ञ प्रा.शरद शिंदे यांनी दहावी नंतरच्या विविध वाटा या बद्दल माहीती देताना म्हणाले की,”या महत्वाच्या टप्याला आपण पार केलेले आहे. यापुढे इंजिनिअरींग, डाॅक्टर, विविध कोर्स करण्याची संधी पुढे आहेत.आपल्या आवडीनुसार क्षेञ निवडावे.त्यात मन लावुन प्रयत्न केल्यास आपल्या जीवनात अनेक संधी येतात. आपल्याला आयुष्याचे नियोजन करता आले पाहीजे.नाविन्याच्या शोधात विद्यार्थी सदैव राहीला पाहीजे. विविध क्षेञात संधी मोठ्याप्रमाणात उपलब्ध आहे.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा राजेंद्र सोनवणे म्हणाले की,”गेली सोळा वर्षांपासुन हा दहावी गुणवंत सोहळा संस्थेच्यावतीने संपन्न होत आहे. भोसरी, पुणे ५० शाळांचा गौरव करताना आनंद होत आहे. वर्षभर संस्थेच्यावतीने अनेक उपक्रम घेतले जातात.चिञ रंगभरण स्पर्धा,एक तास कवितेचा कवी तुमच्या भेटीला, इ. होय. कवितेची आवड निर्माण होण्यासाठी शाळेमध्ये बालकाव्यमंच स्थापन करण्यात येणार आहे. संस्थेच्यावतीने बालकाव्यमैफल शाळेत घेणार आहे. गुणवंत विद्यार्थी हे कठोर परिश्रम घेऊन यश मिळवितात. गुणवंताचा सत्कार हा गुणीजनांना दिलेली कौतुकाची थापच असते.”

यावेळी भोसरी,पुणे परिसरातील ५०शाळेत यश मिळाल्याबद्दल गोल्डमिडल, गुलाबपुष्प,गौरवपञ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मुख्याध्यापक यांना गौरवपञ,गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्रत्येक प्रथम पाच विद्यार्थी वर्गास सन्मानपञ, गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी वादळकार यांनी केले. बहारदार सूञसंचालन प्रमोद लाड यांनी केले.आभार प्रदर्शन रामदास हिंगे यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.