आतातरी दहिवडी नगरपंचायत प्रशासनाला जाग येणार का?: धिरेंनकुमार भोसले

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.1ऑगस्ट):-प्रभाग क्र.६ गेल्या अनेक वर्षांपासून विकासकामांपासून वंचित आहे.या प्रभागात ग्रामपंचायतीच्या काळात एक रस्ता व बंदीस्त गटाराचे काम वगळता इतर कोणतेही काम गेल्या पाच वर्षात झालेले नाही नगरपंचायत अस्तित्वात येऊन जवळजवळ ६ वर्ष पुर्ण होत आले परंतू या प्रभागात कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.वेळोवेळी नगराध्यक्ष,मुख्याधिकारी यांना पत्रव्यवहार करुनही ते या प्रभागाकडे जाणुनबुजून कानाडोळा करत असल्याचे निदर्शनास येत आहे.गेल्या पंचवार्षिक मध्येही या प्रभागाकडे नगरपंचायतीच्या पदाधिकारी व प्रशासनाने ढुंकूनही पाहिले नाही.या प्रभागाचे नगरसेवक विरोधी बाकावर आहेत म्हणजे तुम्ही जनतेचे हाल करणार का? असा सवाल युवा नेते धिरेंनकुमार भोसले यांनी केला आहे आणि जनतेतूनही विचारला जात आहे.

या प्रभागात रस्ते,गटार,पथदिवे,ड्रेनेज यासारख्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत.कालचीच ताजी घटना श्री.धोंगडे यांच्या घरालगत असलेल्या नाल्याचे पाणी पावसाच्या पाण्यामुळे गटाराच्या पाणी पातळीत वाढ होऊन घरात शिरले यासारख्या अनेक घटना घडूनही नगरपंचायत प्रशासन मुग गिळून गप्प आहे.या प्रभागात जयवंत नगर,म्हाडा कॉलनी,एकता नगरचा परिसर येतो.म्हाडा कॉलनीत तर आजपर्यंत १ रुपयाचेही विकासकाम नगरपंचायतीच्या माध्यमातून झालेले नाही.विशेष म्हणजे या वसाहतीतून ये-जा करण्यासाठी फुटभरही रस्ता,एकही ड्रेनेज नाही याबाबत येथील नागरीकांनी वेळोवेळी नगरपंचायतीला पत्रव्यवहार करूनही त्याकडे कानाडोळा करत आहेत.

या प्रभागात मुबलक पथदिवे नाहीत आणि जे आहेत ते बर्याच दिवसापासुन बंद आहेत,प्रभागात एकही कोंक्रेटचा रस्ता नाही,चेंबरची दुरावस्था झाल्याने शाळकरी मुलांसह,वयोवृद्ध लोकांनी मुकी जनावरे, प्राणी त्यात पडुन जखमी होत आहेत.धिरेंनकुमार भोसले म्हणाले वेळच्यावेळी घरपट्टी,पाणीपट्टी भरूनही मुलभूत सोईसुविधा मिळत नाहीत,एकही रस्ता प्रभागात नसल्याने सद्याच्या पावसात नागरीकांना चिखलातून कसरत करावी लागत आहे.याविषयी विचारणा केली असता पदाधिकार्यांसह प्रशासकीय अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.त्यामुळे आतातरी झोपलेल्या प्रशासनाला जाग येणार का? हे पहावे लागेल.जर या प्रभागातील नागरिक वेळोवेळी पाणीपट्टी आणि घरपट्टी व नगरपंचायतीचा असलेला कर वेळोवेळी भरत असून सुद्धा जर प्रभागात सुविधा मिळणार नसतील तर येथील नागरिकच आपला हक्क मिळविण्यासाठी आंदोलन करतील आणि आपला हक्क आणि सोयी सुविधा मिळवतील असे धिरेंन कुमारभोसले म्हणाले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED