प्रहारच्या वतीने एस.टी महामंडळाच्या विरोधात नायगावात रास्ता रोको

✒️नायगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नायगाव(दि.1ऑगस्ट):-नायगाव ही नांदेड जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ व तालुक्याचे ठिकाण असतांना येथे एसटी महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे. कोनती बस केंव्हा येणार ,आहे का गेली हे कळायला मार्ग नाही कारण येथे कायमस्वरूपी कंट्रोलर किंवा प्रवासी मित्राची नेमणूक व्हावी कारण नायगाव येथील बसस्थानकावर बस न थांबता 100 मिटर पुढे किंवा 100 मिटर मागेच थांबते त्यामुळे दिव्यांग, अंध,गरोदर महिला,पेशंट यांना त्रास होतोय म्हणून तेथे कायमस्वरूपी कंट्रोलरची नियुक्ती करावी.

दुसरी बाब अशी की नर्सी-कुंटूर-ऊमरी ही बस रामभरोसे म्हणावे लागेल कारण कधी मेंटेनन्स चे कारण, कधी वाहक नाही, मशीन उपलब्ध नाही या ना त्या कारणांमुळे बस अचानक रद्द केल्याने त्याचा विध्यार्थ्यांना फटका बसतो आहे. मासिक पास काढून विध्यार्थ्यांना खाजगी वाहनातून प्रवास करावा लागत असल्याने याचा विरोधात प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आणी कुंटूर परीसरातील गावकऱ्यांच्या वतीने दिनांक 11 आँगस्टला नायगाव येथील बस स्थानकावर रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन बिलोली आगार प्रमुख श्री पवार यांना देण्यात आले, यावेळी दिव्यांग शक्ती चे पत्रकार चांदू आंबटवाड, मारोती मंगरूळे,आशाताई रेड्डी, साईनाथ बोईनवाड, हानमंत सिताफुले व अन्य कार्यकर्ते हजर होते..

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED