बसपाच्या वतीने आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

34

✒️श्रीरामपूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

श्रीरामपुर(दि.1ऑगस्ट):-बहुजन समाज पार्टी श्रीरामपूर विधानसभेच्या वतिने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश आहिरे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष जाकीर शहा यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रकाश अहिरे हे होते. त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील विविध पैलूवर प्रकाश टाकला. उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, तुकाराम भाऊराव उर्फ शिवाशीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वटेगाव नावाच्या छोट्या गावात झाला. अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रात कवी म्हणून परिचित असले, तरी त्यांनी कथा आणि कादंबर्याो जोमातही हाताळल्या.

तांत्रिकदृष्ट्या अशिक्षित, अशिक्षित माणूस, अण्णाभुंनी लोककले, कथा, नाटकं, लोकनाट्ये, कादंबरी, चित्रपट, पावडे, लावण्य, योनी, गवळण, प्रवर वर्ण अशा सर्व प्रकारच्या मराठी साहित्याला समृद्ध केले आणि तमाशाला लोकप्रिय लोक बनवले. नाटक करण्यासाठी अण्णाभाऊंना दिले आहे. पोवाडे, लावण्य, गीत, पदम हे कवितांचे प्रकार सामान्य लोकांमध्ये त्यांच्या कल्पनांचा प्रचार करीत असत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी राजकीय मुद्द्यांविषयी महाराष्ट्रात प्रचंड जनजागृती केली. गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. असे त्यांनी सांगितले.
यावेळी अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश आहिरे, जिल्हा सचिव सुनिल मगर, श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष जाकीर शहा यांचेसह विधानसभा महासचीव भारत त्रिभुवन, विधानसभा सचिव अरुण हिवराळे,मा.मच्छिंद्र ढोकणे, शहराध्यक्ष योगेश ससाणे, शहर सचिव संजय सूर्यवंशी, माजी शहराध्यक्ष किशोर ठोंबरे, शहर संघटक कृष्णा कदम, बीव्हीएफ पोपट खरात, सामाजिक कार्यकर्ते भारत शिंगे, विश्वनाथ नरोडे, अनिल त्रिभुवन आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.