रक्तदानाच्या महान कार्याबद्दल सन्मान

31

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.1ऑगस्ट):-दैनिक महासागरचे जिल्हा प्रतिनिधी
श्री जितेंद्र मशारकर हे आपल्या परिवारातील सदस्यांच्या वाढदिवशी निरंतर रक्तदान करीत असतात. जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासते. आपल्या रक्तदानामुळे एखाद्या रुग्णाचे प्राण वाचावे, याच उदात्त हेतूने ते रक्तदान करीत असतात. नुकतेच त्यांनी त्यांचे लहान चिरंजीव स्व. कुशल याच्या वाढदिवशी जिल्हा सामान्य रुग्णालयात विक्रमी ६३ वी वेळ रक्तदान केले.

त्यांच्या या महान कार्याची दखल घेत श्रमिक पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात माजी मंत्री तथा आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राज्य माहिती आयुक्त मान. राहुल पांडे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मान. मझहर अली, पत्रकार संघाचे पदाधिकारी व पत्रकार बंधू उपस्थित होते.