सुवर्ण महोत्सवी शाळेत वन्यजीव संरक्षण संस्था जळगाव यांच्या वतीने जनजागृती कार्यक्रम संपन्न!….

37

🔸सर्प हा मानवाचा मित्र असतो. – जगदीश बैरागी

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.1ऑगस्ट):– धरणगाव शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे नागपंचमीचे औचित्य साधून वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्था जळगाव येथील पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी.डी.पाटील यांनी केले प्रमुख अतिथींचा परिचय सर्पमित्र भरत शिरसाठ यांनी करून दिला.सर्वप्रथम शाळेतील वन्यजीव संस्थेचे जिल्हाप्रमुख जगदीश बैरागी , सर्पमित्र भरत शिरसाठ, कृष्णा दुर्गे, ईश्वर बडगुजर, राजेंद्र कुंभार, निलेश चौधरी, आबासाहेब राजेंद्र वाघ यांचा शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार व शिक्षक वृंदांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी १ ऑगष्ट ते १० ऑगष्ट जनजागृती मोहिमेअंतर्गत वन्यजीव संस्था जळगावचे जिल्हाप्रमुख जगदीश बैरागी यांनी सर्प हा मानवाचा मित्र असतो.महाराष्ट्रातील विषारी व बिनविषारी सर्पाबद्दल विद्यार्थ्यांना विस्तृत अशी माहिती दिली. रात्रीच्या वेळी बाहेर निघताना टॉर्च, काठी व शूज घालून निघावे. सर्पदंश झाल्यावर प्राथमिक उपचार कसे करावे ? याविषयी सर्पमित्र भरत शिरसाठ व त्यांच्या टीमने प्रात्यक्षिक करून दाखविले.

सर्पाला कान नसतात, सर्प कधीच दूध पीत नाही, सर्प कधीच बदला घेत नाही व सर्प मनुष्य योनीमध्ये कधीच रूपांतर होऊ शकत नाही. जगदीश बैरागी यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे समाधान केले. आपल्या परिसरात सर्प निघाला तर त्याला मारू नका आपण सर्पमित्रांना फोन करा व सर्वांना वाचवा असे प्रतिपादन बैरागी यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी.डी.पाटील तर आभार एस.व्ही.आढावे यांनी मानले.