
🔸उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन सादर
✒️अतुल उनवणे (जालना, जिल्हा प्रतिनिधी, मो:-9881292081)
जालना(दि-3 जुलै) जालना जिल्ह्यातील मंठा येथील वैष्णवी गोरे या नवविवाहित तरुणीचा भर रस्त्यात व भर चौकात खून करण्याऱ्या आरोपीस फाशी ची शिक्षा देण्यात यावी असे निवेदन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांचे नावाने जालना जिल्हाधिकाऱ्यांचे यांचे मार्फतीने सादर करण्यात आले.
मंठा जिल्हा जालना येथील वैष्णवी गोरे या तरुणीचे नुकतेच लन्ग होऊन रिवाजाप्रमाणे येती जातीसाठी माहेरी आलेल्या नवविवाहित तरुणीचा क्रुरकर्मा शेख अल्ताफ याने भरदिवसा व भर चौकात चाकुने वार करुन निघ्रणपणे खुन केला आहे ही घटना मनाला हेलावुन टाकणारी व अत्यंत क्रुर असुन घटनेने सर्वत्र संतप्त भावना उमटल्या आहेत.
गांभिर प्रकरणात उपमुख्यमंतत्र्यानी लक्ष घालुन आरोपीस फाशीची शिक्षा झाली पाहिजे,यासाठी हा खटला फास्टट्रॉक कोर्टमार्फत चालवुन उज्वल निकम यांची नेमणुक करावी व प्रकरण अंडरट्रयल चालले यासाठी संबंधित यंत्रणेस आदेशीत करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
निवेदनात केलेल्या मागण्या मान्य न झाल्यास सावता परिषदेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्री कल्याणराव आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला.
निवेदन सादर करतांना योगेश भैय्या जाधव सावता परिषद युवक जि उपाध्यक्ष गोरखनाथ खैरे नगरसेवक बदनापुर प्रल्हाद जाधव ता अध्यक्ष भारत शिंदे सरपंच नागठाणा सुनिल बनकर समता परिषद ता अध्यक्ष कैलाश खैरे हारिओम जाधव राम वाघमारे सचिन खैरे सचिन नेमने अलिम पठान संतोष सोनुवणे अजिंक्य जह्रराड आदीची उपस्थिति होती.