सुभेदार अशोक आरसुळ भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त

🔸२८ वर्षे देशातील जम्मू-काश्मीर, गुजरात, पंजाबसह विविध राज्यात देशसेवा

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.2ऑगस्ट):-भारतीय सैन्य दलातील सुभेदार अशोक माणिकराव आरसुळ हे १९९४ साली भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. दरम्यान २८ वर्षे देशातील जम्मू-काश्मीर, गुजरात, पंजाबसह विविध राज्यात त्यांनी देशसेवा केली असून ते दि.३१ जुलै २०२२ रोजी सैन्यदलातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या सेवापुर्ती निमित्त त्यांचा ठिकठिकाणी सत्कार करुन गौरव होत आहे.

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील बेनसुर येथील रहिवासी अशोक माणिकराव आरसुळ (युनिट – १५ मराठा एल.आय) यांनी दि.१३ जुलै १९९४ पासून दि.३१ जुलै २०२२ पर्यंत भारतीय सैन्य दलात २८ वर्षे देशातील जम्मू-काश्मीर, गुजरात, पंजाब, आसाम, उत्तरप्रदेश, महाराष्ट्रासह विविध राज्यात देशसेवा केली आहे.तर २८ वर्ष देशसेवेनंतर ते ३१ जुलै २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.

बीड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED