शिक्षणाधिकाऱ्यांना स्वतःच्या पत्राचा विसर

29

🔹उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदोन्नतीचा मार्ग धूसर

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.2ऑगस्ट):-जिल्हा परिषद अंतर्गत उच्च् श्रेणी मुख्याध्यापकांचे अंदाजे 57 ते 80 पदे रिक्त् असतांना सदर पदे भरण्यासाठी मान.शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी पत्र क्रमांक /शिक्षण(प्राथ)/2598/2022 दिनांक 15/07/2022 नुसार अनेक संदर्भ देत कार्यालयीन कामे जलदगतीने करण्याकरिता सर्व तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांना जवळपास दोन पत्रे काढून तात्काळ माहिती मागितली . पण त्याच कार्यवाहीत स्वतः तत्परता दाखवितांना दिसत नाहीत. आज जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकांचे काम प्रभारी मुख्याध्यापकांना करावे लागत आहे. परिणामी अनेक सेवा जेष्ठ शिक्षक आपले विषयाचे अध्यापन करुन मुख्याध्यापकाचे काम करीत आहेत.

आजमितीस मुख्याध्यापकांना ऑनलाईनचे कामांचा प्रचंड ताण आहे. रोजच्या रोज कामांच्या यादीचा ससेमिरा सुरु आहे. विस्तार अधिकारी शिक्षण ची 35 पदे रिक्त् आहेत. केंद्रप्रमुखांची 91 पदे रिक्त् आहेत. एवढा रिक्त पदांचा डोंगर आवासून उभा असतांना जिल्हा परिषद चंद्रपूर प्राथमिक शिक्षण विभाग उच्च् श्रेणी मुख्याध्यापकांची फाईल निकाली काढण्यासाठी 5- 6 महिनेचा विलंब लावतात आणि वारंवार त्रुटया दाखवून फाईल सामान्य प्रशासन विभागातून परत येत आहे याचे कारण काय असावे. गोपनीय अहवाल जोडले नाही, जन्मतारीख चुकीची आहे, अशा क्षुल्ल्क चुकांसाठी त्रुटया दर्शवून पदोन्नतीची प्रक्रिया रखडली जाणे म्हणजे जाणून बुजून पदोन्नती प्रक्रिया लांबविण्याचा तुघलकी प्रकार दिसुन येत आहे.

तकलादू पत्र काढण्यात शिक्षणाधिकारी जितके तत्पर आहेत तशीच तत्परता उच्च् श्रेणी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी दाखवावी व लवकरात लवकर पदोन्नतीची प्रक्रिया राबवून पदोन्नतीच्या प्रतिक्षेत असलेल्या शिक्षकांना न्याय प्रदान करावे अशी एका निवेदनादवारे मागणी महा.पुरोगामी शिक्षक समितीचे राज्यनेते विजय भोगेकर, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, राज्याध्यक्ष महिला मंच अल्का ठाकरे,जिल्हा प्रमुख सल्लागार दिपक व-हेकर, जिल्हा नेता नारायण कांबळे,जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार,जिल्हा सरचिटणीस संजय चिडे, जिल्हा कार्याध्यक्ष गंगाधर बोढे, जिल्हा कोषाध्यक्ष सुनिल कोहपरे, कार्यालयीन सचिव सुरेश गिलोरकर जिल्हा उपाध्यक्ष मोरेश्वर बोंडे,रवि सोयाम,सुधाकर कन्नाके,लोमेश येलमुले,जिल्हा नेता महिला मंच सुनिता इटनकर,महिला मंच अध्यक्ष विद्या खटी, महिला मंच सरचिटणीस पौर्णिमा मेहरकुरे,महिला मंच कार्याध्यक्ष सिंधु गोवर्धन,महिला मंच कोषाध्यक्ष लता मडावी, महिला मंच उपाध्यक्ष पुनम सोरते, सुलक्षणा क्षिरसागर, ,सहसचिव दुष्यंत मत्ते,प्रमुख संघटक नरेश बोरीकर,महिला मंच प्रमुख संघटक ज्ञानदेवी वानखेडे यांनी केलेली आहे असे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख लक्ष्मण खोब्रागडे एका पत्रकान्वये कळविले आहे.