सर्वसामान्य गोरगरीब कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी चिखलबीड जिल्हा परिषद गटातून अपक्ष निवडणूक लढवणार-दत्ता वाकसे

105

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.2ऑगस्ट):-काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषद गट आणि गणाचे आरक्षण जाहीर झाले असून त्याच अनुषंगाने आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रत्येक जण निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरण्यासाठी सज्ज झालेला असून याच अनुषंगाने बहुजन समाजाचे नेते दत्ता वाकसे यांनी प्रसिद्धीस पत्रक देत म्हणाले आहे की सर्वसामान्य कष्टकरी कामगार दिनदलित गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी आगामी निवडणुकीमध्ये अपक्ष निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरणार आहे.

त्यामुळे कष्टकरी सर्वसामान्य जिंदगीत वंचित घटकाला कुठेतरी न्याय मिळावा हा उद्देश पुढे ठेवून निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून सर्वसामान्य माणूस स्वाभिमानाने जगला पाहिजे हा उद्देश मनाशी बाळगून चळवळीमध्ये काम करत आहे त्यामुळे त्यामुळे आगामी काळात चिखल बीड जिल्हा परिषद गटातील जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी मी येणार आहे प्रस्थापित लोकांना आता जनता कंटाळलेली असून त्यामुळे मी सर्वसामान्य माणूस हा स्वाभिमानाने जगला पाहिजे या उद्देशातून मी आगामी काळातील होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरणार आहे त्यामुळे चिखल बीड जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य माणसाने दिल दलित कष्टकरी यांनी मला मताच्या माध्यमातून न्याय द्यावा असे देखील प्रसिद्धी पत्रकाद्वारे बहुजन समाजाचे नेते दत्ता वाकसे यांनी म्हटले आहे

….चौकट….
आता माझा लढा प्रस्थापिताच्या विरोधामध्ये
वडवणी तालुक्यातील प्रस्थापित लोकांनी आपली मक्तेदारी ही कायम ठेवली असून त्यामुळे या प्रस्थापिताच्या विरोधामध्ये मी आगामी काळात चिखलबीड जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणार आहे व या ठिकाणी असलेले प्रस्थापित लोक हे प्रत्येक वेळी निवडणुका आले की सर्वसामान्य जनतेला भुलताप देऊन मत घेतात आणि त्यांची पाच वर्षे फसवणूक करतात त्यामुळे यावेळी मी कुठल्याही प्रकारची फसवणूक होऊ देणार नाही त्यामुळे मी चिखलबीड जिल्हा परिषद गटातून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहे