आर्वी येथे अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांची संयुक्त जयंती साजरी

🔹राजेश शिरगरे मित्र परिवाराचे आयोजन

✒️आर्वी प्रतिनिधी(पियुष रेवतकर)

आर्वी(दि.2ऑगस्ट):-येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजेश शिरगरे मित्र परिवारा तर्फे आयोजित जगविख्यात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला आर्वी शहरातील सर्व सामाजिक व राजकीय संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते तत्क्षणी कार्यक्रम स्थळी उपस्थित मान्यवरांनी सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मित्र परिवाराच्या वतीने पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

व जगविख्यात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन मा राजेश अहीव सर राष्ट्रीय लहु शक्ती प्रदेश सरचिटणीस मनिष उभाड ,भाजपा किसान संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळा सोनटक्के नेरी उपसरपंच यांनी केले व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या यांच्या प्रतिमेचे पूजन दिलिप पोटफोडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष, रोहन हीवाळे संभाजी ब्रिगेड तालुका ,अध्यक्ष प्रफुल्ल शिरसागर संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष, नितीन आष्टीकर माजी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष यांनी केले तसेच काही मान्यवर मंडळीनी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जिवणचरित्रावर अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले व आभार प्रदर्शन राजेश शिरगरे यांनी व्यक्त केले.

त्या प्रसंगी कार्यक्रमाला सचिन वैद कॉग्रेस जिल्हा महासचिव वर्धा लोकसभा क्षेत्र रविंद्र खंडारे ,दिनेश राऊत ,प्रशात हेरोडे ,शैलश तलवारे ,पांडुरंग मलिये ,प्रविण कडु ,किशोर काळपांडे ,चंदु वानखडे ,महेंद्र मात्रे ,रजाक आली ,सचिन दहाट ,राहुल काळे ,प्रविण पावडे ,विलास ठाकरे ,आशिष कदम ,नितीन तलांजी ,मंगेश प्रधान ,संजय डोंगरे ,प्रविण डोंगरे, संकेत थुल, समिर चोरे, प्रफुल धुळे ,प्रदिप रूईकर ,गोपाल शर्मा ,अशोक कठाने, दिनकर कोयरे , अजय पखाले ,रोशन राऊत ,राजेंद्र नाखले ,प्रशांत कदम, राजेश कदम ,विकी तलवारे ,राजेश कावळे, शुभम तळेकर ,मंगेश कडु, संजय कावळे, सुधाकर वाघमारे इत्यादींची उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED