तीन ग्रामसेवक जिल्हा आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित

27

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.3ऑगस्ट):-पंचायत समितीतील विजय इसलकर व भारत गरड आणि कल्पना जतकर हे जिल्हा आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे मानकरी ठरले. त्यांना यवतमाळ येथील जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अमोल येडगे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गुडधे, मंचावर उपस्थित होते

यावेळी पुसद पंचायत समिती अंतर्गत तीन आदर्श ग्रामसेवकांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये सन २०१७-१८ करिता विजय इसलकर सन २०१८-१९ करिता भारत गरड व सन २०२०-२१. करिता कल्पना जतकर यांचा समावेश आहे.