बीडमध्ये मुख्याध्यापकाला मारहाण करून खंडणी मागितली

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.4ऑगस्ट):-शाळेत येऊन मुख्याध्यापकाला मारहाण करून सात लाख रुपये खंडणी मागितल्याचा प्रकार शहरातील मिल्लीया माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा (मुलींची) येथे घडला. या प्रकरणी मोहंमद जुबेर याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात खंडणीसह शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील मिल्लीया माध्यमिक व उच्च माध्यमिक (मुलींची) शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सिद्दीकी मोहंमद इरफान सादुल्ला यांनी बीड शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

बुधवारी (ता. दोन) शाळेतील इतर शिक्षकांसोबत उपस्थित असताना त्याठिकाणी आलेल्या मोहम्मद जुबेर उल्ला खान (रा.शहेंशाह नगर, बीड) याने माझ्याकडे सात लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून शिवीगाळ करत लाथा-बुक्याने मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी मुख्याध्यापक सिद्दीकी मोहमद इरफान यांच्या फिर्यादीवरून मोहंमद जुबेर याच्याविरुद्ध बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अंतरप करीत आहेत.

Breaking News, क्राईम खबर , बीड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED