उमेश शेषराव कुटे यांची वंजारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष पदावर निवड

29

✒️जालना(पुरोगामी न्युज नेटवर्क)

जालना(दि.4ऑगस्ट):- वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य शाखेच्या वंजारी महासंघ जालना जिल्हाध्यक्षपदी उमेश कुठे यांची निवड करण्यात आली आहे.

वंजारी हा क्षत्रिय कुलंवशीत समाज असुन वंजारी समाजाचा खरा इतिहास घरा घरात पोहचवणे,कुलदैवत रेणुकामाता, राष्ट्रसंत भगवान बाबा, संत वामन भाऊ, संत अवजीनाथ महाराज यांचे अतुलनीय कार्य आणि विचार घरा घरात पोहचवणे, लोकनेते स्वर्गिय गोपीनाथरावजी मुंडे यांचे वंजारी समाजाच्या जडणघडणीमध्ये असणारे योगदान नविन पिढीला प्रेरणादायी ठरवे यासाठी विचारांचा वसा आणि वारसा हा जनसामान्यांच्या पर्यंत पोहचविणे,संस्कार युक्त पिढी घडविण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन तसेच शिक्षणाचं महत्त्व आणि नौकरीतील संधी यावर वेळोवेळी मार्गदर्शन करून समाज जागृती करण हे वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य चे धेय्य आहे.

वंजारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश खाडे सर यांच्या अध्यक्षतेखाली यांची नियुक्ती करण्यात आली आहे , यावेळी जालना जिल्ह्याचे पदाधिकारी परमेश्वर केंद्रे, रामेश्वर केंद्रे, अनिल घोडे, नितीन तुपसुंदर, परमेश्वर ढाकणे, योगेश सानप, सचिन कुटे, अमोल खंडाळे, दिलीप वाघ उपस्थित होते.