राम मेघे इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट बडनेरा येथील रासेयो द्वारे आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात

31

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.4ऑगस्ट):- विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावती द्वारा संचालित प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट बडनेरा- अमरावती येथील राष्ट्रीय सेवा योजना भारत सरकार च्या बहुआयामी आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत सांगाबाअवि निदेर्शित हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात महाविद्यालयाच्या परिसरात राष्टीय सेवा योजना द्वारे सदर अभियानाची माहिती विद्यार्थ्यांना देऊन सुरवात करण्यात आली.

राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या निदेर्शांनुसार दिनांक १३ ते १५ एप्रिल २०२२ दरम्यान आयोजित आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा अभियानाचे प्रचार व प्रसार करीत जनजागृती केली. या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयाने दिनांक ६ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे नियोजीले आहे जसे कि विविध वृक्ष लागवड आणि वृक्षसंवर्धन उपक्रम, दत्तक ग्राम परिसरात अभियानाची जनजागृती करणे, घरो घरी तिरंगा लावणे व त्याची पूर्ण काळजी घेणे, तिरंग्याचा अपमान मी करणार नाही आणि तो कोणाला करू हि देणार हि नाही भावना जागृत करणे व अशीच भावना विद्यार्थ्यांनी त्यांच्या राहत्या परिसरात, गावात, शहरात प्रचार व प्रसार करावा हे आवर्जून सांगण्यात आले.

कार्यक्रमाची आखणी महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.आशिष सायवान आणि महिला रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. गायत्री बहिरे यांनी सह-कार्यक्रम अधिकारी प्रा शुभम कदम, प्रा. अतुल दहाने, प्रा अपर्णा खैरकर, श्री निशांत केने तसेच रासेयो स्वयंसेवक पूजा सोनोने, अमीर फराझ, आदित्य मसराम, साद अहमद, आयुष भगत, मोनाली गुल्हाने, चैताली चौरे, मो. अदनान, वैष्णवी सोलव, वैष्णवी ठाकरे, मिन्हाज अली, निखिल प्रजापती यांच्या गायत्री नांदुरकर यांच्या सहभागाने आयोजन केले व सर्व महाविद्यालयीन रासेयो स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. अली उपप्राचार्य प्रा. पि व्ही खांडवे आणि संगाबाअवि रासेयोचे संचालक डॉ राजेश बुरंगे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीनजी धांडे, उपाध्यक्ष अॉड. उदयजी देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. हेमंतजी देशमुख, सचिव युवराजसिगजी चौधरी, सन्माननिय सदस्य शंकररावजी काळे, नितीनजी हिवसे, सौ. रागिनीताई देशमुख, डॉ. सौ. वैशालीताई धांडे व डॉ. सौ. पुनमताई चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या.