मोफत (स्त्री/पुरुष) कॅन्सर रोग निदान व उपचार शिबीराचे उद्घाटन संपन्न

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

 चिमुर(दि.5ऑगस्ट):- जनता पार्टी तालुका चिमूर यांचे संयुक्त विद्यमाने भव्य मोफत (स्त्री/पुरुष) कॅन्सर रोग निदान व उपचार शिबीराचे उद्घाटन संपन्न झाले.

सदर शिबिरात स्तनाचे आजार (कॅन्सर), गर्भाशयाचे आजार (कॅन्सर), फुप्फुसाचे आजार (कॅन्सर), तोंडाचे आजार (कॅन्सर), मधुमेह तपासणी, रक्त तपासणी इत्यादी आजारांची तपासणी व उपचार केल्या जात असून सर्व कॅन्सरग्रस्त रुग्णांनी सदर शिबिरात आपली तपासणी करून उपचार करावे असे जागरूक आवाहन भाजपा तालूका चिमूर च्या वतीने केले आहे.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतभाऊ वारजूकर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, भाजपा तालुका महामंत्री प्रशांत चिडे, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्षा मायाताई नन्नावरे, भाजयुमो तालुकाध्यक्ष किशोर मुंगले, भाजपा ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष एकनाथ थुटे, भाजपा अनुसूचित जाती आघाडी तालुकाध्यक्ष जयंत गौरकार, भाजपा युवा नेते समीर राचलवार, खलोरे काका, विवेक कापसे, प्रवीण गणोरकर, संजय खाटीक, विनोद चोखरे, लीलाधर बन्सोड, विलास कोराम, निलेश गभने, राजू बानकर, कैलास धनोरे, सावन गाडगे, श्रेयस लाखे, अमित जुमडे, आकाश ढबाले, दुर्गा सातपुते, आशा मेश्राम, भारती गोडे, आदित्य कारेकर, प्रमोद श्रीरामे, दांडेकर व इतर भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक, स्वास्थ 

©️ALL RIGHT RESERVED