आजादी का अमृत महोत्सव व कैलासवासी न्यानेश्वर गणपतराव टाकळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त टाकळकरवाडी राजगुरुनगर येथे व्याख्यानमाला कार्यक्रमाचे आयोजन

32

✒️राजगुरुनगर प्रतिनिधी(मनोहर गोरगल्ले)

राजगुरुनगर(दि-५ऑगष्ट) आजादी का अमृत महोत्सव कैलासवासी ज्ञानेश्वर गणपतराव टाकळकर यांच्या स्मृतिदिना निमित्त टाकळकरवाडी राजगुरुनगर ‌ येथे व्याख्यानमाला सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे दुसरे पुष्प व्याख्याते माननीय श्री अमोलजी राऊत सर यांनी१८५७ चा उठा व जालियनवाला बाग हत्याकांड तसेच क्रांतिकारक यांनी भारत देश स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्राण्यांचे आहुती देत फासावर गेल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे तिसरे पुष्प व्याख्यान खेड पोलीस स्टेशनचे पीआय माननीय सतीश गुरव साहेब हे होते त्यांनी मुलांना सांगितले की मी आपणास व्याख्यान न देता आपणा बरोबर हितगुज करून गप्पा मारणार असल्याचे सांगितले. त्यामुळे मुलांनी टाळ्या वाजवून साहेबांचे स्वागत केले.

हितगुज करत असताना साहेबांनी सांगितले की मुलांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे मोबाईलवर जास्त गेम खेळू नये तसेच मुलींना काही अडचण असल्यास खेड पोलीस स्टेशनच्या निर्भया पथकाशी संपर्क साधावा. तसेच हितगुज करत असताना मुलांनी माननीय गुरव साहेब यांना अनेक प्रश्न विचारले त्याचे साहेबांनी मनमोकळेपणे उत्तरे दिली. माननीय कैलास टाकळकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष तर प्रमुख पाहुणे म्हणून न्यू स्टार फाईव्ह मराठी मीडियाचे कार्यकारी संपादक माननीय मनोहर गोरगल्ले होते. यावेळी कार्यक्रमाला शिवशंभू छावा प्रतिष्ठान अध्यक्ष माननीय दत्तात्रय दाजीराम टाकळकर, सचिव माननीय सिताराम टाकळकर सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय सुरेश भाऊ टाकळकर, उपाध्यक्ष माननीय दत्तात्रेय टाकळकर, आदर्श सरपंच राजेंद्र टाकळकर, संचालक श्री बबनराव टाकळकर, मुख्याध्यापक मांजरे सर, श्री ढोरे सर, श्री काकडे सर, आदक मॅडम, पिंगळे मॅडम,बांगर मॕडम पोलीस कॉन्स्टेबल सुरेखा कजबे, पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गोडसे सेवक विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते ल