बेलसणी गावातील नागरिकांच्या समस्या त्वरित सोडविणार -ब्रिजभूषण पाझारे

🔸पुरातवाहून गेलेल्या रस्त्याचे काम त्वरीत सुरु होणार

🔹माजी जिल्हा परिषद सभापती ब्रिजभूषण पाझारे यांच्या पाठपुराव्याला यश

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.5ऑगस्ट):-जिल्हासह संपूर्ण राज्यात पुरा मुळे भिषण परिस्थिती निर्माण झालेली आहे . कित्येक घरांची पडझड झाली . तर कित्येक रस्ते पुराच्या पाण्याखाली गेल्याने वाहून गेले आहेत, अशातच बेलसणी गावातील मुख्यमंत्री सडक योजनेतून तयार करण्यात आलेला रस्ता पुराच्या पाण्यामुळे वाहून गेला ,बेलसणी येथील नागरिकाची अडचण लक्षात येताच माजी जिल्हा परिषद सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा सुचनेनुसार पाठपुरावा केला , व आता त्वरित रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरु करण्यात येणार आहे.

माझ्या कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या समस्या त्वरित सोडविण्याकरिता मी प्रयत्नशील आहे. कुठल्याही परीस्थित नागरिकांच्या समस्या सोडविणारच असे माजी जिल्हा परिषद सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी सांगितले . बेलसणी येथील सरपंच श्री. पुणे यांनी सुद्धा रस्त्यच्या समस्येबाबत माजी जिल्हा परिषद सभापती ब्रिजभूषण पाझारे याचे लक्ष वेधले होते त्याअनुषगाने शाशकीय अभियंता सौ. रामटेके यांचेशी संपर्क साधून रस्ता पाहणी करिता बोलविण्यात आले तसेच सदर रस्ता त्वरित दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे अभियंता सौ. रामटेके यांनी सांगितले

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED