वीज कोसळल्याने चामोर्शी तालुक्यातील लक्ष्मणपूर येथील महिला जागीच ठार

8

✒️नितीनरामटेक(गोंडपिपरी,तालुका प्रतिनिधी

,मो:-8698648634)

चामोर्शी/गोंडपीपरी(दि.4जुलै): सध्या शेतकऱ्याच्या शेतातील कामना वेग आला आहे अश्यातच शेतात कापूस पिकाची लावणी करून घराकडे परत येत असताना महिलेवर वीज कोसळल्याने सदर महिला हि मृत्यू पावली तर सोबत असलेले पती काही अंतरावर असल्याने पती गंभीर जखमी झाल्याची घटना लक्ष्मणपूर येथे दि 3जुलै ला संध्याकाळी 6 वाजता घडली, या घटनेत संगीता टीकाराम मडावी (35)हीचा जागीच मृत्यू झाला तर टीकाराम मडावी (40) मृत महीलचे पती हे काही अंतरावर असल्याने ते गंभीर जखमी झाले
लक्ष्मणपूर येथील रहिवासी हे पती पत्नी लक्ष्मणपूर पासून तीन ते चार किमी असलेल्या मुधोली चक नं 2 या गावाच्या परिसरात असलेल्या शेतात कापूस पिकाचा लावणी साठी आलेला या महिलेवर संध्याकाळी 6 च्या सुमारास वीज पडून मृत्यू झाला ,या महिलेचे पती गंभीर जखमी झाले याना दोन मुले असल्याने परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत ,सदर घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी सदर घटनास्थळी येऊन चौकशी केली,