सोहाळे ग्रामपंचायतीवर भीमा परिवाराचा दणदणीत विजय

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(दि.6ऑगस्ट):- मोहोळ तालुक्यातील सोहाळे गावामध्ये भीमा सहकारी कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीश अण्णा जगताप यांच्या नेतृत्वाखाली भीमा परिवार विकास आघाडीने सलग चौथ्यांदा निर्विवाद बहुमत मिळवले आहे. भीमा परिवार विकास आघाडी विरुद्ध सर्व विचार विकास आघाडी अशी या निवडणुकीत लढत होती. यावेळी भीमा परिवाराचे नऊ उमेदवार विजय घोषित झाल्यानंतर कार्यकर्त्यांमधुन जल्लोष साजरा करण्यात आला. मोहोळ मधून भीमा परिवाराचे विजयी उमेदवार व सतीश अण्णा जगताप 50 60 गाड्यांच्या ताफा घेऊन भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी येथे कै. भीमराव महाडिक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जल्लोष साजरा करण्यात आला.

भीमा कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीश अण्णा जगताप व विजयी उमेदवारांचा कुरुल मध्ये पत्रकार सुहास घोडके, भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक चंद्रसेन बापू जाधव,व भीमा परिवार यांच्या हस्ते सतीश अण्णा जगताप व विजयी उमेदवारांचा पेढे वाटून सत्कार करण्यात आला.सोळा ग्रामपंचायती राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतीच्या ११ जागेसाठी 24 उमेदवार रिंगणात होते. एकूण मतदान 2 हजार 575 मतदारांपैकी 2हजार 234 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

या निवडणुकीमध्ये सतीश जगताप यांचे चिरंजीव ऋषिकेश जगताप यांना सर्वात जास्त 497 मते मिळाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी.एम माळी यांनी काम पाहिले.

भिमा परिवार विजय उमेदवारांना मिळालेली मते . ऋषिकेश सतीश जगताप 497,विद्या चित्रकांत बचुटे 485,नकुशा संजय बाबर 480,श्रीमंत देवप्पा कांबळे 394,बाळासाहेब नाईकनवरे 386 ,विजया अर्जुन जगताप 385, माया ईश्वर गौडदाब 234, अनुराधा किरण पवार 240 ,धर्मराज सिद्राम सोनवणे 235 समविचारी आघाडी मधील दोन. अंकुश भगवान जगताप 235 छाया सारंग गौडदाब 252 सतीश अण्णा जगताप यांच्या कार्यावर विश्वास ठेवून विरोधकाचे कुठल्याही आमिषाला बळी न पडता मतदार बंधूंनी गेल्या पंधरा वर्षापासून या ग्रामपंचायतीवर धनंजय महाडिक यांच्या भीमा परिवाराचे वर्चस्व गेल्या पंधरा वर्षात भिमा परिवाराचे नेते जगताप यांनी गावातील सुविधा रस्ते पाणी वीज या मूलभूत सुविधा नागरिकांना दिल्या तर उर्वरित राहिलेला विकास या पाच वर्षात करू असे त्यांनी सांगितले.

समविचारी आघाडीमध्ये समविचारी आघाडीमध्ये राष्ट्रवादीचे माजी सभापती पाटील ,एकनाथ जगताप, अंकुश जगताप यांचा समावेश होता. सम विचार आघाडीने वेगवेगळ्या मतदारांना आम्ही सुधारण्याचा प्रयत्न केला परंतु मात्र त्यांना मतदारांनी नाकारले. भीमा सहकारी साखर कारखान्याची व्हाईस चेअरमन सतीश अण्णा जगताप यांच्या कार्यावर विश्वास ठेवून भरघोस मताधिक्यांनी उमेदवारांना विजयी करण्यात आले. यावेळी भीमा परिवाराचे पॅनल प्रमुख सतीश अण्णा जगताप यांनी भरगोस च्या मुलाने उमेदवारांना निवडून दिल्याबद्दल मतदार बंधूंचे आभार मानले.यावेळी व्हा.चेअरमन सतीश आणा जगताप, युवा नेते युवराज चौगुले, पत्रकार सुहास घोडके, व सोहळे ग्रामस्थ व युवक आदी सर्व उपस्थित होते.

महाराष्ट्र, राजकारण, राजनीति, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED